नाशिक : 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला संधी असताना पक्षाच्या कुठल्याही नेत्याला मुख्यमंत्री केले असते तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तेव्हाच फुटला असता, असा दावा शरद पवारांनी केला. पण हा दावा अजित पवारांनी आज पूर्णपणे खोडून काढला. शरद पवार धादांत खोटे बोलले, असे सांगून अजित पवारांनी “सुधाकरराव नाईक प्रयोगाला” घाबरून शरद पवारांनी 2004 मध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ दिला नाही, असा स्पष्ट गौप्यस्फोट केला.Sharad pawar frightened of sudhakar naik experiment, therefore he didn’t make anyone chief minister from NCP, said ajit pawar
गरवारे क्लब मध्ये बोलावलेल्या राष्ट्रवादीच्या चिंतन बैठकीत अजित पवारांनी शरद पवारांच्या प्रत्येक निर्णयाची अक्षरशः पिसे काढली. 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्यमंत्री केला असता, तर पक्ष तेव्हाच फुटला असता, असा दावा पवारांनी नुकताच केला होता. तो दावा अजित पवारांनी खोडून काढला. यावेळी अजितदादांनी 1991 ची सुधाकरराव नाईक प्रयोगाची सविस्तर आठवण सांगितली.
अजित पवार म्हणाले :
1991 मध्ये शरद पवारांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद सोडून केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून जावे लागले. त्यावेळी काँग्रेस पक्ष अखंड होता. शरद पवारांच्या जागी मुख्यमंत्रीपदासाठी कोणाला नेमायचे यावर काँग्रेस पक्षात चर्चा सुरू झाल्यानंतर पद्मसिंह पाटील यांचे नाव पुढे आले. कारण त्यावेळी पद्मसिंह पवारांच्या मंत्रिमंडळात वरिष्ठ नेते म्हणून गृहमंत्री होते. काँग्रेसमधल्या बहुतांश नेत्यांचा पद्मसिहांनाच मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा होता. परंतु शरद पवारांनी आपला अधिकार वापरून पद्मसिंह पाटील यांच्या ऐवजी सुधाकरराव नाईक यांच्या पारड्यात आपले वजन टाकून त्यांना मुख्यमंत्री केले.
परंतु सुधाकरराव नाईक यांनी अवघ्या वर्षभरातच शरद पवारांचे ऐकणे सोडून दिले. सावच टप्प्यात आल्यानंतर मी शिकार करतो, असे म्हणत त्यांनी शरद पवारांवरच टीका करायला सुरुवात केली. त्यावेळी पवारनिष्ठ असलेल्या 17 मंत्र्यांना मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी तडकाफडकी काढून टाकले होते. आम्हाला मंत्रिमंडळातून काढून टाकल्याचा निरोप विजयसिंह मोहिते पाटलांनी आम्हाला दिला होता.
शरद पवारांसाठी हा अनुभव धक्कादायक होता. आपणच नेमलेला मुख्यमंत्री आपले ऐकत नाही हे पवारांच्या लक्षात आले होते. त्यामुळेच 2004 मध्ये आपण राष्ट्रवादीतल्या कोणाला मुख्यमंत्री केले, तर तो नेता देखील सुधाकरराव नाईक यांचा कित्ता गिरवेल आणि आपले ऐकणार नाही, ही भीती पवारांना वाटली त्यामुळे पवारांनी आमच्यापैकी कोणालाच मुख्यमंत्री केले नाही आणि 2004 ची संधी कायमची गमावली गेली.
ही सविस्तर आठवण अजित पवारांनी सांगून शरद पवार “सुधाकरराव नाईक प्रयोगाला” कसे घाबरले होते, हाच गौप्यस्फोट केला!!
सुधाकरराव नाईक यांनी का ऐकले नाही??
अजित पवारांनी गरबा एक क्लब मधल्या मेळाव्यात सुधाकरराव नाईक हा विषय काढून पवारांच्या जुन्या जखमेवरची खपली काढली. कारण सुधाकरराव नाईक यांनी फक्त पवारांना पवारांच्या 17 समर्थक मंत्र्यांनाच मंत्रिमंडळातून डच्चू दिला असे नाही, तर शरद पवारांनी पोसलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तींना म्हणजेच पप्पू पलानी आणि हितेंद्र ठाकूर यांना ठेचून काढले होते. या कामासाठी सुधाकरराव नाईक यांना तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव, केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण आदी नेत्यांचा भक्कम पाठिंबा होता. या पार्श्वभूमीवर शरद पवार केंद्रात आणि महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये अलग-थलग पडले होते. नरसिंह राव यांच्या विरोधात कुठलीही कारवाई करणे पवारांना राजकीय दृष्टी आणि बौद्धिक दृष्ट्या शक्य नव्हते. त्यामुळे केंद्राच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पवारांची पुरती कोंडी झाली होती.
पण त्यानंतर मुंबई दंगल आणि मुंबई बॉम्बस्फोट याचे निमित्त करून शरद पवारांनी सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री पदावरून हटविण्याचा घाट घातला. त्यावेळी पद्मसिंहांचे नाव पुढे आले होते. महाराष्ट्रातल्या नेतृत्व बदलाचा तब्बल 13 दिवस घोळ चालला होता. परंतु नरसिंह राव यांनी आयत्यावेळी महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून शंकरराव चव्हाण जायला तयार आहेत, अशी “गुगली” शरद पवारांना टाकली या “गुगली”त पवारांची केंद्रातल्या संरक्षण मंत्री पदाची विकेट गेली आणि पवारांना महाराष्ट्रात सुधाकरराव नाईक यांची “रिप्लेसमेंट” म्हणून मुख्यमंत्रीपदी यावे लागले. पवारांच्या राजकीय कारकिर्दीला झालेली ही जुनी राजकीय जखम आहे. तिच्यावरची खपली आज अजितदादांनी गरवारे क्लबच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन बैठकीत काढली आणि महाराष्ट्राचे “चाणक्य” आपणाच नेमलेल्या मुख्यमंत्र्याला कसे घाबरले होते, याचा इतिहास राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना समजला!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App