संभ्रम निर्माण करणे हा पवारांचा स्वभाव; ते स्वतःच निर्णय घेतात, पण दाखवतात सामूहिक; अजितदादांचा टोला!!

विशेष प्रतिनिधी

पुणे : लोकांमध्ये सतत संभ्रम निर्माण करत करणे हा शरद पवारांचा स्वभाव आहे. तो आता बदलणार नाही. त्यामुळे पवार पहिल्यांदा संभ्रम निर्माण करतात, मग स्वतःच निर्णय घेतात पण तो निर्णय मात्र सामूहिक झाल्याचे दाखवतात, अशा परखड शब्दांमध्ये अजित पवारांनी शरद पवारांच्या राजकारणाचे वाभाडे काढले. Pawar’s nature is to create confusion

राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन करण्यासंदर्भात शरद पवार यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात त्याचे मोठे पडसाद उमटले. देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या इतर नेत्यांनी पवारांच्या शरणागतीचे वेगळे वर्णन केले. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पवारांच्या राजकारणाची चिरफाड केली.



अजित पवार म्हणाले :

  • शरद पवार कितीही म्हणाले की, विलीनीकरणाबाबत कोणताही निर्णय सामूहिक पद्धतीने सहकाऱ्यांची चर्चा करून घेऊ तरी ते निर्णय स्वतःच घेतात, पण तो सामूहिक घेतला असे दाखवतात.
  • शरद पवार संभ्रम निर्माण करण्यासाठी वक्तव्य करतात. त्यांना पाहिजे तेच ते करतात. तो त्यांचा स्वभाव आहे. तो बदलणे शक्य नाही. आम्हाला मध्येच ते म्हणतात मी निवृत्त होतो. परंतु त्यांच्या मनामध्ये वेगळेच असते. जे मनामध्ये असते तेच ते करतात. परंतु दाखवताना हा निर्णय सामूहिक असल्याचे दाखवतात.
  • भाजप बरोबर जाण्याची चर्चा झाल्याचे शरद पवार आता किमान मान्य करत आहेत. त्यासाठी 6 बैठका झाल्या होत्या. जर भाजप सोबत जायचे नव्हते तर का झाल्या होत्या या बैठका??
  • उद्धव ठाकरे त्यांची शिवसेना काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करतील असे वाटत नाही. मी अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून त्यांना पाहिले आहे. एकंदरीत ते असा काही निर्णय घेण्याची शक्यता नाहीच.
  • शरद पवारांचा पराभव करणे हेच आमचे उदीष्ट आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी केलेले विधान चुकीचे आहे. त्यांची चूक झाली हे मी मान्य करतो. त्यानंतर आम्ही त्यांना सांगितले तुम्ही बारामतीत येऊ नका. आम्ही पाहतो. त्यानंतर त्यांच्याकडून असे वक्तव्य झाले नाही.
  • शरद पवार पक्ष सोडून जाणाऱ्यांना परत घेणार नाही, असे म्हणाले होते, पण निलेश लंके यांना परत घेतलेच ना!! राजकारणात असे काहीच नसते. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कोणी कायमचा मित्र नसतो.
  • साताऱ्याची जागा आम्ही सोडली आहे, त्या बदल्यात आम्हाला राजसभेची जागा मिळणार आहे. म्हणून आम्ही आमची हक्काची जागा सोडली.

Pawar’s nature is to create confusion

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात