९२ वर्षांच्या बाबांना गाठले कॅन्सर सदृश विकाराने; उपचार चालू

महाराष्ट्रातील ज्येष्ठ सामाजिक नेते डॉ. बाबा आढाव वयाची नव्वदी ओलांडल्यावर ही वंचितांच्या हिताच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरतात. पण या वयात त्यांना दुर्धर विकाराने गाठले आहे. याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. Senior most social leader Dr. Baba Adhav diagnosed Cancer like symptoms


प्रतिनिधी

पुणे : “माझ्या भावंडांनो, सध्या मला ब्याण्णव वर्षे चालू आहे. तरीसुद्धा माझी तब्येत अत्यंत सुदृढ आहे. परंतु निसर्ग नियमाप्रमाणे वाढत्या वयाबरोबर काही व्याधीही मागे लागल्या आहेत. हाडे ठिसूळ झाली आहेत आणि अश्या ठिसूळ झालेल्या पाठीचा मणका त्रास देतोय. त्याची योग्य ती आधुनिक तपासणी झाली आहे. तपासणीत हाडांच्या ठिसूळपणा बरोबरच काहीशी कॅन्सर सारख्या व्याधीची लागण झाल्याचे उजेडात आले आहे,” असे निवेदन ज्येष्ठ सामाजिक नेते डॉ बाबा आढाव यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

या निवेदनात डॉ. बाबा म्हणतात, “सध्या मी घरीच आहे. त्याचं कारण मी थोडा आजारी आहे. आजाराचं कारण जे आहे ते तुम्हाला कळावं त्यासाठी माझं हे छोटेसे निवेदन तुम्हा सर्वांच्या माहितीकरिता.”

“सध्या मला ब्याण्णव वर्षे चालू आहे. तरीसुद्धा माझी तब्येत अत्यंत सुदृढ आहे. परंतु निसर्ग नियमाप्रमाणे वाढत्या वयाबरोबर काही व्याधीही मागे लागल्या आहेत. हाडे ठिसूळ झाली आहेत आणि अश्या ठिसूळ झालेल्या पाठीचा मणका त्रास देतोय. त्याची योग्य ती आधुनिक तपासणी झाली आहे. तपासणीत हाडांच्या ठिसूळपणा बरोबरच काहीशी कॅन्सर सारख्या व्याधीची लागण झाल्याचे उजेडात आले आहे,” असे डॉ. बाबांनी स्पष्ट केले आहे.

ब्याण्ण्व्या वर्षात उपचाराला मर्यादा आहेत, असे सांगून ते लिहितात की अभिजीत वैद्य हे माझे कुटुंब डॉक्टर आहेत. त्यांच्या सल्ल्याप्रमाणे तसेच डॉ.राजेंद्र कोठारी, डॉ. विजय रमणम या सर्वांनी उपचाराची शर्थ चालवलेली आहे. माझ्या मते हे सगळं निसर्ग नियमाप्रमाणे घडतंय, त्यासाठी आगळं वेगळं काही करण्याची गरज नाहीये. त्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत. मात्र माझ्या हालचालीवर मर्यादा आलेल्या आहेत. माझी खात्री आहे की मी यातून बाहेर पडेल व माझं रुटीन सुरू राहील.

“कृपया आपण कोणीही चिंता बाळगू नये व मला भेटण्याची घाई करू नये,” अशी विनंती डॉ. बाबा यांनी केली आहे.
कारण या आजारामूळे व त्यावरील औषधोपचारामूळे व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी होत जाते. आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारचे इनफेक्शन होणं माझ्या तब्येतीला धोकादायक ठरू शकते. बसल्या जागेवरून जे काय सहकार्य तुम्हाला करता येईल ते ऑनलाईन करेन. वेळोवेळी मी तुम्हाला तब्येतीची खुशाली कळवत राहीनच असेही त्यांनी म्हटले आहे.

Senior most social leader Dr. Baba Adhav diagnosed Cancer like symptoms

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात