म्हणे, तेलंगणातल्या विजयाने महाविकास आघाडीला संधी; पण खरं तर ठाकरे – पवारांना “उरलेल्या” आमदारांच्या गळतीची भीती!!

नाशिक : सेमी फायनल निवडणुकांमध्ये तीन राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला, पण तेलंगणात विजय झाला त्याचा परिणाम महाराष्ट्रात होईल, अशी अटकळ सर्वच पक्षांनी बांधली आणि माध्यमांनी देखील आपापल्या सोयीनुसार चालवली.Semi final election result effect, unrest in uddhav thackeray camp and sharad pawar camp

अशातच शरदनिष्ठ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांची प्रतिक्रिया आली. तेलंगणात काँग्रेसच्या विजयामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीला संधी निर्माण झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात महाविकास आघाडीला चांगले यश मिळू शकते, असा आत्मविश्वास निर्माण झाला आहे, असा रोहित पवारांनी दावा केला आहे.



पण रोहित पवारांनी असा दावा करणे, उद्धव ठाकरेंनी लोकशाही टिकली पाहिजे असे म्हणणे आणि माध्यमांनी भाजपच्या आणि काँग्रेसच्या परफॉर्मन्सच्या आधारे भारतात उत्तर – दक्षिण डिव्हाइड झाले असा दावे करणे यात विलक्षण दांभिक समानता आहे. कारण यापैकी कोणालाही भाजपचा निर्भेळ विजय पचलेला नाही, असा त्याचा खरा अर्थ आहे.

पण रोहित पवार, उद्धव ठाकरे किंवा मराठी माध्यमिक यांना भाजपचा विजय पचला नसला, तरी महाराष्ट्राच्या जनतेवर त्याचा परिणाम व्हायचा राहणार नाही. कारण महाराष्ट्र हा देशाचा एक महत्त्वाचा भाग आहे. तो काही आयसोलेटेड असा खंड नाही पण भाजपचे हे निर्भय यश मान्य करायला आणि काँग्रेसचे तीन राज्यांमधले अपयश आणि तेलंगणात मधले यश नीट समजून घ्यायला जी वास्तववादी बुद्धी लागते, ती “पवारबुद्धीने” भ्रष्ट केल्याने ते कोणाच्या लक्षात येत नाही. पण म्हणून सत्य उघड व्हायचे राहात नाही.

‘आप’ला काँग्रेसचा पाठिंबा, केजरीवाल विरोधकांच्या भेटीला; आज ममता, ठाकरे आणि परवा शरद पवारांना भेटणार

तीन राज्यातल्या भाजपच्या यशाचे आणि काँग्रेसच्या तेलंगणातल्या यशाचे महाराष्ट्रातल्या राजकारणावरच्या पडसादाचे खरे गमक हे आहे की, महाविकास आघाडीला नव्हे, तर काँग्रेसला विदर्भात आणि मराठवाड्यात फायदा होण्याची शक्यता आहे. रोहित पवार महाविकास आघाडीला संधी असा शब्दप्रयोग आपण स्वतःची शरदनिष्ठ राष्ट्रवादी आणि ठाकरे यांची शिवसेना काँग्रेसच्या यशात वाटा मिळवण्यासाठी घुसवत आहेत. प्रत्यक्षात मराठवाड्यात आणि विदर्भात राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची ताकदच नाही. जी ताकद आहे, ती काँग्रेसची आहे. त्यामुळे तेलंगणातला बूस्टर डोस हा काँग्रेस साठी उपयुक्त ठरणार आहे.

त्याचवेळी भाजपच्या तीन राज्यांमधला विजयाचा बूस्टर डोस महाराष्ट्रात भाजपला तर उपयोगी पडेलच, पण त्या डोस मधले काही अंश अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या गटांना देखील मिळणार आहेत.

पण त्या पलीकडे जाऊन एक मोठा परिणाम यातून साधण्याची शक्यता आहे, तो म्हणजे ठाकरे – पवारांकडे उरलेल्या आमदारांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. भाजप तीन राज्यांमध्ये ज्या ताकदीने निवडणुकीच्या मैदानात उतरला त्याच ताकदीने महाराष्ट्राच्या मैदानात उतरला तर आपले काय होईल?? याची भीती ठाकरे आणि पवारांकडे उरलेल्या आमदार खासदारांना निर्माण झाली आहे.

मूळातच आपण शरद पवारांची एकनिष्ठ आहोत असे दाखविणाऱ्या अनेक आमदार – खासदारांनी आधीच अजित पवारांना पाठिंबाची प्रतिज्ञापत्रे देऊन ठेवली आहेत. त्यामुळे आपले उरलेसुरले राजकीय भवितव्य शरद पवार गटात असुरक्षित राहणार असेल तर इथे राहून तरी उपयोग काय??, असा विचार शरद पवारांच्या गटात उरलेले आमदार करत आहेत.

 पवारबुद्धीची मराठी माध्यमे

जी शरद पवारांच्या गटात उरलेल्या आमदारांची चलबिचल सुरू झाली आहे, तीच ठाकरे गटात उरलेल्या आमदारांच्या मनातही सुरू आहे. त्यांनाही स्वतःचे भवितव्य घडवायचे असेल, तर ठाकरेंची एकनिष्ठ राहून फारच तिकीट मिळेल, पण त्या तिकिटावर निवडून येण्याची गॅरंटी कोण घेईल??, ही शंका ठाकरे गटातल्या आमदारांना भेडसावत आहे. शिवाय महाराष्ट्रात ठाकरे – पवार पॅटर्न चालणार असे संजय राऊत म्हणतात. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्या पॅटर्नची तिकिटे घेतली, तरी जर मोदींच्याच गॅरंटीने निवडून यायचे तर त्या पॅटर्नचा उपयोग तरी काय??, अशी शंका ठाकरे – पवारांकडे उरलेल्या आमदारांना वाटत आहे. त्यातून या दोन्ही गटांमधल्या आमदारांची चलबिचल वाढली आहे. हा खरा तीन राज्यांचा भाजपच्या विजयाचा परिणाम आहे, पण तो “पवारबुद्धीची” मराठी माध्यमे लपवून ठेवत आहेत.

Semi final election result effect, unrest in uddhav thackeray camp and sharad pawar camp

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात