वृत्तसंस्था
पुणे : येत्या दोनदिवसांत काँग्रेसच्या दोन मंत्र्यांचीही नावे भ्रष्टाचाराच्या यादीत येणार असल्याचे सांगून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील भ्रष्टाचाराची रिक्षा आकारास येणार असून ती राज्यात आणखी सुसाट धावणार असल्याचे उघड झाले आहे. Scandal of two Congress ministers to be exposed: Chandrakant Patil; The whole rickshaw of corruption now Will run at full speed
दोन वर्षापूर्वी अनैसर्गिक आघाडी सत्तेवर आली होती. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले होते. तेव्हा या सरकारला तीनचाकी रिक्षाची उपमा विरोधी पक्षांनी दिली होती. आता ही रिक्षा जनतेला सोबत न घेता भ्रष्टाचार करून स्वतःचे घर भरून घेत असल्याचे अनेक प्रकरणावरून सिद्ध झाले. प्रथम शिवसेना, राष्ट्रवादीची प्रकरणे बाहेर आली. आता काँग्रेसच्या दोन मंत्र्यांची नावे जाहीर करणार असल्याचे पाटील यांनी जाहीर करून रिक्षाचे तिसरे चाकही भ्रष्टाचाराच्या खड्ड्यात अडकल्याचे सांगितले. त्यामुळे ही भ्रष्टाचाराची रिक्षा नॉन स्टॉप अधिकाअधिक भ्रष्टाचार करण्याच्या दिशेने धावत असल्याचे चित्र आहे. रिक्षाचा मुक्काम कोणत्या कोणत्या नेत्यांच्या, मंत्र्यांच्या घरावरून जाणार हे आता काळच ठरविणार आहे, असे एकूण दिसते.
चंद्रकात पाटील म्हणाले..
मुश्रीफांना कोणतीही ऑफर दिली नाही
मुश्रीफ यांना सांगायचंय पॅनिक होऊन काही होत नसत. कारवाई झाल्यानं आणि घोटाळे बाहेर पडत असल्याने मुश्रीफांचा ड्रामा सुरु आहे, ड्रामा बंद करा, कायद्याची लढाई कायद्याने लढा, असं प्रत्युत्तर चंद्रकांत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांना दिलं आहे.
माझं नाव घेतल्याशिवाय झोप लागत नाही
मुश्रीफ यांना माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही. माझ्या विरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा करू शकतात. अनिल देशमुख यांच्यावर ईडीची कारवाई झाली पण ते माहिती देत देत सहकुटुंब गायब झाले. तसाच मार्ग मुश्रीफ यांच्याकडे असल्याचं ते म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App