एकाच व्यक्तीची, नेत्याची अनेक विविध रूपे असतात. त्याचे गुणावगुण अनेक प्रकारे प्रकट होत असतात. आपल्यासारखा सर्वसामान्य माणूस त्याकडे स्तिमीत नजरेने पाहत राहतो…!!अशाच एका नेत्याचे नवे रूप आज महाराष्ट्रासमोर आले आहे…Sanjay Raut says Chandrakant Patil valued only 1.25 rupee
ते दुसरे – तिसरे कोणीही नसून महाराष्ट्रातल्या महा विकास आघाडीचे “उपशिल्पकार” शिवसेना खासदार, सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत हे आहेत…!! आजच त्यांनी महाराष्ट्रातल्या “पॉलिटिकल रिझर्व बँकेचे गव्हर्नर” म्हणून सूत्रे हाती घेतली आहेत. सूत्रे हाती घेतली आहेत, म्हणजे त्यांनी महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांची किंमत ठरवायला सुरुवात केली आहे.
महाराष्ट्रातल्या 105 आमदारांच्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची किंमत त्यांनी सव्वा रुपया ठरवून टाकली आहे. अर्थातच ज्या अर्थी त्यांनी एवढ्या मोठ्या पक्षाच्या एवढ्या मोठ्या नेत्याची “एवढी मोठी” किंमत ठरवून टाकली आहे, त्या अर्थी ते स्वतः “पॉलिटिकल रिझर्व बँके”चे स्वयंघोषित आणि स्वयंनियुक्त गव्हर्नर आहेत हे उघड आहे…!!
त्यामुळेच आता संपूर्ण महाराष्ट्राला किंबहुना देशाला, ते महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या विविध राजकीय नेत्यांची किंमत कोणकोणत्या रुपयांमध्ये ठरवणार याची जबरदस्त उत्सुकता लागून राहिलेली आहे…!!
303 खासदारांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचे डेप्युटी अमित शहा, महाराष्ट्रातल्या 56 आमदारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, 54 आमदारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, देशातल्या 55 खासदारांच्या काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी, महाराष्ट्रातल्या 44 आमदारांच्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदी नेत्यांची नेमकी किंमत किती…?? याचे त्रैराशिक, आकडेमोड “पॉलिटिकल रिझर्व बँके”च्या कार्यालयात सुरूही झालेली दिसते.
ते आकडे नेमके किती फुटतात??, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे किंबहुना संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेले आहे. आत्तापर्यंत अशा पद्धतीची किंमत कोणी ठरवलीच नव्हती. त्यामुळे कोणाची नेमकी किंमत किती??, त्याचे निकष काय?? हे सगळे आता “पॉलिटिकल रिझर्व बँके”चे स्वयंनियुक्त गव्हर्नर ठरवून जाहीर करतील,
त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्राला हे समजून येईल की आपण ज्या पक्षाला मतदान करून त्यांना सत्तेवर बसवण्याचा मनसूबा रचला होता, त्या पक्षाच्या नेत्यांची नेमकी रुपयात किंमत किती?? आणि त्यानुसार ते कदाचित (म्हणजे मतदार) पुढच्या निवडणुकीत आपली स्वतःची ही किंमत मनातल्या मनात निश्चित करून मतदान करतील.
अर्थात “पॉलिटिकल रिझर्व बँके”चे गव्हर्नर आणि त्यांचे गुरू सध्याचे गुरू यांनी महाराष्ट्रातल्या मतदारांची किंमत “शून्य” ठरवून नवीन आघाडी त्यांच्यावर बसवून दाखविली आहेच…!! त्यामुळे महाराष्ट्रातला मतदार आता कदाचित आपली “खरी किंमत” त्यांना दाखवून देण्याची वाट बघतो आहे, असे वाटते आहे.
पण एकूण हे खरंच बरे झाले “पॉलिटिकल रिझर्व बँके”च्या गव्हर्नरांनी 105 आमदारांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांची निवडणूक सव्वा रुपया ठरवून टाकली. त्यामुळे महाराष्ट्रातला मतदार आता 56 आमदारांच्या मुख्यमंत्र्यांची, 54 आमदारांच्या “राष्ट्रव्यापी” पक्षाची आणि 44 आमदारांच्या राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांची नेमकी किंमत किती?? याविषयी कदाचित विचार करायला लागेल आणि आपला “निकाल” घेईल. महाराष्ट्राच्या पॉलिटिकल शेअर बाजारात तर त्याची चर्चा सुरूही झाली आहे…!!
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App