सामनाकरांचा ममतांना सल्ला; हत्तीची सरळ धडक चाल आणि उंटाची तिरकी चाल!!


सबूर… सबूर… सबूर…!! सामनाकरांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना सबुरीचा सल्ला दिला आहे, की काँग्रेस शिवाय कोणतीही आघाडी बनू शकत नाही. काँग्रेसला वगळून विरोधी पक्ष भाजप अशी लढणे म्हणजे भाजपला फायदा करून देणे आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी थोडी सबुरी दाखवावी. चर्चेतून मार्ग निघू शकेल, असा सल्ला सामनाकारांनी ममता बॅनर्जी यांना दिला आहे. Samankar’s advice to Mamata; A straight stroke of an elephant and a slant of a camel !!

पण ममता बॅनर्जी यांना हा सल्ला आहे? की महाराष्ट्रातल्या आपले सरकार काँग्रेसच्या टेकूवर तरले आहे या दाहक वास्तवाची जाणीव झाल्यानंतर आल्यानंतर सामनाकरांनी काँग्रेसला चुचकारले आहे??…, हे समजायला फार मोठ्या राजकीय शास्त्राचा अभ्यास करावा लागत नाही. देशात काँग्रेस पक्ष हा राष्ट्रव्यापी दुसऱ्या नंबरचा पक्ष आहे हे सांगण्यासाठी सामनाची गरज नाही.

पण जेव्हा ममता बॅनर्जी या शरद पवार यांच्या शेजारी उभे राहून यूपीएचे अस्तित्व पुसून टाकतात. त्यानंतर दोन दिवसांनी सामनाकार ममता बॅनर्जी यांना सल्ला देतात… यातच त्या फोल सल्ल्याची राजकीय मेख दडली आहे…!!

ज्या पद्धतीने ममता बॅनर्जी यांच्यावर काँग्रेसचे नेते उसळले आहेत ते पाहता त्याचे पडसाद महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उमटू नयेत याची काळजी सामनाकारांना घेणे भाग होते. कदाचित तो “सल्ला” त्यांना सिल्वर ओकवरून देखील आला असावा. त्यामुळे आपल्याच उपस्थित ममतांनी युपीएवर बॉम्ब टाकल्याने नेमके काय करायचे याची पवारांना चिंता वाटली असावी आणि म्हणूनच दोन दिवसानंतर का होईना पण काँग्रेसला चुचकारणारा आणि ममतांना हलकेच टोला मारणारा सल्ला सामनाकरांच्या लेखणीतून त्यांनी दिला असावा…!!



प्रादेशिक पक्ष कितीही मोठे झाले तरी काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाला ते पर्याय निर्माण करू शकत नाही, ही राजकीय वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपण काँग्रेसचे नुकसान केले तर काँग्रेस देखील आपले नुकसान करू शकते याची जाणीव या प्रादेशिक पक्षांनी ठेवणे आवश्यक आहे. ती जाणीव ममतांनी ठेवण्याचे कारण नाही. कारण त्यांची राजकीय शक्ती बंगालपुरती मर्यादित असली तरी ती पूर्ण शक्ती आहे. शिवसेना किंवा राष्ट्रवादी सारखी 50 – 60 आमदारांच्या फेऱ्यात अडकलेली नाही. ममतांचे पश्चिम बंगाल मध्ये 213 आमदार आहेत. महाविकास आघाडीतल्या तिन्ही घटक पक्षांचे मिळून सुद्धा तेवढे आमदार नाहीत. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी काय विचार करावा आणि स्वतःचे राष्ट्रीय पातळीवरचे नेतृत्व कशा पद्धतीने पुढे न्यावे, हे सामनाकारांनी सांगणे म्हणजे हत्तीला उंटाच्या तिरक्या चालीत चालायला सांगण्यासारखे आहे…!! ही उंटाची तिरकी चाल अर्धवट ताकदीमध्ये राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या पक्षांना, त्यांच्या नेत्यांना शोभते. पण ममता बॅनर्जींसारख्या स्वकर्तृत्वावर राष्ट्रीय वाटचाल करू इच्छिणाऱ्या नेत्याला विलासराव देशमुख म्हणतात त्याप्रमाणे हत्तीची धडक देणारी चालच शोभते…!!

ममता बॅनर्जींना जसा सल्ला सामनाकरांनी अग्रलेखातून दिला आहे, तसेच भाष्य ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालच्या तृणमूल काँग्रेसच्या मुखपत्राने “जय बांगला”ने केले आहे. काँग्रेस संपूर्णपणे विरोधी पक्षांचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम नाही, असे परखड भाष्य “जय बांगला”ने अग्रलेखातून केले आहे. याचा अर्थ उघड आहे उंटाच्या तिरक्या चालीपेक्षा हत्तीची धडक देणारी सरळ चाल “जय बांगला” आणि अनुषंगाने ममता बॅनर्जी यांना अपेक्षित आहे. त्यामुळे सामनाकरांचा सिल्वर ओक मार्फत आलेला सल्ला ममता बॅनर्जी किती गांभीर्याने घेतील, याविषयी कोणाला संशय असण्याची गरज नाही.

– युपीए अध्यक्षपदाच्या सल्ल्याचे काय झाले?

त्याच बरोबर सहाच महिन्यांपुर्वी सामनामधून
शरद पवारांच्या युपीए अध्यक्षपदाच्या समर्थनाची मोहीम चालविण्यात आली होती. त्या मोहिमेचे काय झाले?? आज सामनाकारांच्या मुखातून सोनिया गांधींच्या यूपीए नेतृत्वावर कोणाचा आक्षेप नाही, असे वक्तव्य करण्यात आले आहे. पण सहाच महिन्यांपूर्वी सोनिया गांधींच्या नेतृत्वावर सामनातून आक्षेप घेण्यात आला होता ना…!! त्याचे काय झाले?? काँग्रेस नेतृत्वाने त्यावेळी सामनाकारांच्या सल्ल्याची काय वासलात लावली होती, हे लक्षात आल्याने आता सामनाकरांनी आपली भूमिका बदललेली दिसते. महाराष्ट्रात ममता बॅनर्जी यांच्या आक्रमकतेचे फटके महाविकास आघाडीला बसू नयेत यासाठीच ही काळजी घेतलेली दिसते. बाकी काही नाही…!!

Samankar’s advice to Mamata; A straight stroke of an elephant and a slant of a camel !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात