विज्ञानाचे रहस्य : चांगले कोलेस्टेरॉल मानवाचा जन्माचा जोडीदार


ड जीवनसत्वाचा अभाव ही सध्याची अनेकांची समस्या आहे. अगदी तरुणांनाही आता ही कमतरता जाणवते. याचे कारण म्हणजे जीवनशैलीत झालेला बदल. कारण अनेक जण आता सकाळपासून दिवसभर कार्यालयातील एसीच्या वातावरणातच असतात. घरी आले की अंधार झालेल असतो. त्यामुळे अनेकांना महिनोनमहिने सूर्यदर्शनही घडत नाही. त्यामुळे नैसर्गिकरित्या ड जीवनसत्व घडण्याची प्रक्रिया मंदावते. शरीरात जीवनसत्त्व ड तयार होण्यासाठी कोलेस्टेरॉल लागते. कोलेस्टेरॉलमुळे शरीराला आवश्यक असणारी अनेक विकरे किंवा हार्मोन्स बनतात. त्या शिवाय सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे पित्तरस. यकृतात कोलेस्टेरॉलचा वापर करून पित्तरस बनतो. Good cholesterol human birth partner

हा पिवळसर हिरवा रंग असणारा पित्तरस लहान आतड्यात अन्न पचविण्याचं काम करतो. आपल्या शरीरात कोलेस्टेरॉल बनलेच नाही तर आपल्याला अनेक शारीरिक क्रिया करताच येणार नाहीत. कोलेस्टेरॉल आपला शत्रू नाही तर जन्माचा जोडीदार आहे. हे कोलेस्टेरॉल सूर्यप्रकाशाच्या मदतीनं त्वचेच्या वरच्या स्तरात ड जीवनसत्त्व तयार करतं, उन्हात जायचं ते त्यासाठी. सूर्यापासून प्रकाश मिळतो त्यात विविध प्रकारच्या प्रकाश लहरी असतात. त्यांपैकी अतिनील ब किंवा अल्ट्राव्हायोलेट प्रकारच्या तरंगलहरी ड जीवनसत्त्व बनण्यासाठी उपयुक्त असतात. कोलेस्टेरॉलपासून ड जीवनसत्त्व बनतं ते आपल्या त्वचेच्या वरच्या स्तरात. जितकी त्वचा सूर्यप्रकाशाला उघडी असेल तितक्या प्रमाणात ड जीवनसत्त्वाचे कच्चे रेणू तयार होतात. हे काम अगदी कोवळ्या उन्हात होऊ शकत नाही.

सूर्य साधारण क्षितिजापासून पंचेचाळीस अंश वर आला की, हे काम सुरू होतं. सकाळच्या म्हणजे कोवळ्या नव्हे; पण चटका बसणार्याहही नव्हे अशा उन्हातच आपलं शरीर ड जीवनसत्त्व बनवू शकतं. २५ ते ३० मिलीग्रॅम प्रती चौरस सेंटिमीटर. आधुनिक जीवनशैलीत उन्हा-तान्हातले कष्ट आणि सूर्य यांना हद्दपार करण्याला विकसित झाल्याचे मानले जाते. ती कल्पना लवकरात लवकर दूर केली पाहिजे. कारण न वापरल्यानं माणसाची शेपूट गेली. तसेच न वापरल्यानं शरीराची ड जीवनसत्त्व निर्माण करणारी यंत्रणा संपायला नको.

Good cholesterol human birth partner

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात