सलमान खानची व्हिडीओ गेमविरोधात न्यायालयात धाव, हिट अ‍ॅँड रन प्रकरणावरील सेलमन भाई गेमवर घातली बंदी


विशेष प्रतिनिधी

मुंबई : हिट अ‍ॅँड रन प्रकरणावर बनलेल्या सेलमन भाई नावाच्या गेमविरोधात अभिनेता सलमान खान याने न्यायालयात धाव घेतली आहे. या व्हिडीओ गेमवर तात्पुरती बंदी घालण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. २००२साली सलमानच्या लँड क्रूझर गाडीने वांद्रा येथे एका फुटपाथवर झोपलेल्या पाच लोकांना चिरडले होते असा आरोप करण्यात आला होता. Salman Khan filed court case against video game, Salman Bhai game banned

याच प्रसंगावर आधारित ही गेम बनल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे न्यायालयाने व्हिडीओ गेमचे निर्माते पॅरोडी स्टुडिओज प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याच्या संचालकांना ही गेम प्रसारित करणे, लॉन्च करणे किंवा सलमानशी संबंधित कोणतीही माहिती प्रसारित करण्यावर निर्बंध घातले आहेत.त्याचबरोबर गूगल प्ले स्टोअर तसेच इतर सर्व प्लॅटफॉर्मवरून गेम ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहे. न्यायालयाने म्हटले आहे की ही गेम आणि त्यातील चित्रे पाहिल्यावर प्रथमदर्शनी सलमान खान याची ओळख पटते. तसेच यातील आशय हा हिट अ‍ॅँड रन प्रकरणाशी जुळणारा आहे. सलमान खान याची परवानगी ही गेम बनविण्यासाठी घेतलेली नाही. या गेममुळे सलमान खानची प्रतिमा कलंकित केली जात आहे. सलमान खानला गोपनीयतेच्या अधिकारापासून वंचित केले जात आहे आणि त्याची प्रतिमाही डागाळली जात आहे.

Salman Khan filed court case against video game, Salman Bhai game banned

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था