पूजारी केवळ मालमत्तेचा व्यवस्थापक, मंदिराच्या मालमत्तेचा मालक देवच, सर्वोच्च न्यायालयाचे निरिक्षण


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पूजारी केवळ मालमत्तेचा व्यवस्थापक आहे. मंदिरातील मालमत्तेचा मालक देवच आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. पुजारी अथवा व्यवस्थापकाचं नाव महसुली दाखल्यांमध्ये नमूद असणे अजिबात आवश्यक नाही, कारण या जमिनीची मालकी त्या त्या देवतेची असते असे न्यायाधीश हेमंत गुप्ता व एस बोपन्ना यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.The priest is only the manager of the property, the owner of the temple property is God, observation of the Supreme Court

मालमत्तादार या रकान्यामध्ये केवळ देवतेचं नाव नमूद करणं आवश्यक आहे. कारण कायद्याच्या दृष्टीनं त्या जमिनीची मालकी त्या देवतेची असते. त्या जमिनीचा वापरही देवताच करत असते जो नोकर, व्यवस्थापक आदीच्या मार्फत होत असतो. म्हणून, व्यवस्थापक अथवा पुजारी यांचं नाव वापरकर्ता या रकान्यातही लिहिण्याची गरज नाही, असे निकालपत्रात नमूद करण्यात आले आहे.



मध्य प्रदेश सरकारच्या एका याचिकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं हा निकाल दिला आहे. मध्य प्रदेश सरकारनं दोन आदेशांद्वारे महसूल विभागाच्या नोंदींमधून पुजाऱ्यांची नावे काढण्याचे जाहीर केले होते. पुजाºयांनी अनधिकृतरीत्या मंदिराची मालमत्ता विकू नये म्हणून ही सर्कुलर्स काढण्यात आली होती. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दोन्ही सर्कुलर बरखास्त केली, त्याविरोधात मध्य प्रदेश सरकारनं सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल केली होती.

पुजाºयांचा मंदिराच्या मालमत्तेवर हक्क असल्याचा प्रतिवादींचा दावा होता व त्यांचा हा हक्क राज्य सरकारच्या आदेशांमुळे रद्द होत नाही असं म्हणणे होते. यासंदर्भात निवाडा देताना अयोध्या खटल्याचा निकाल व दाखला समोर ठेवला आहे.

The priest is only the manager of the property, the owner of the temple property is God, observation of the Supreme Court

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात