नवाबांनी आणला होता राणा भीमदेवी थाट; दुबईच्या फोन नंतर पवारांनी दाखवला “कात्रजचा घाट”!!


“नवाबांनी आणला होता राणा भीमदेवी थाट; दुबईच्या फोन नंतर पवारांनी दाखवला कात्रजचा घाट…!!” अशी स्थिती राष्ट्रवादी काँग्रेसवर येऊन ठेपली. ही स्थिती स्वतः शरद पवार यांच्या भूमिकेमुळे आली आहे.Rana Bhimdevi That was brought by Nawabs; After the phone call from Dubai, Pawar showed “Katraj’s Ghat”

अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला, तसा नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला असता तर ही वेळ पवारांवर आलीच नसती. पण भाजप पुढे झुकायचे नाही. भाजपने कितीही आदळआपट केली तरी नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यायचा अशी भूमिका पवारांनी घेतली. ती 15 – 20 दिवस कशीबशी रेटली. पण आखिर नवाब मलिक यांचे पंख छाटायचा निर्णय त्यांना घ्यावा लागला…!!



मलिक बिनखात्याचे मंत्री

सगळी खाती काढल्यावर नवाब मलिक आता बिनखात्याचे मंत्री म्हणून मंत्रिमंडळात राहणार आहेत. त्यांच्याकडचे मुंबई प्रदेशाध्यक्षपद काढून घेऊन ते राष्ट्रवादीच्या मुंबई महापालिकेतील गटनेत्या राखी जाधव यांना देण्यात येईल, तर नवाब मलिक ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्या दोन जिल्ह्यांचा पालकमंत्र्यांचा कार्यभार दुसऱ्या मंत्र्यांकडे म्हणजे अंकुश टोपे आणि प्राजक्त तनपुरे यांच्याकडे देण्यात येईल. हे राष्ट्रवादीने जाहीर केले नसले तरी हा निर्णय पवारांना घ्यावा लागला आहे…!!

अधिकार गेले

नवाब मलिक हे तुरुंगात राहून मंत्रीपद टिकवू शकतात, हा गेले 20 दिवस पवारांनी महाराष्ट्रात समज पसरून दिला होता. पण हा समाज अखेर “खोटा” असल्याचे त्यांना मान्य करावे लागले आणि त्यांचा राजीनामा अधिकृतपणे घेतला नाही तरी नवाब मलिक यांची अधिकारपदे मात्र त्यांना काढून द्यावी लागली आहेत.

दुबईच्या फोनचे रहस्य

अर्थात, या यामागे भाजपचा दबाव आहे, असे मानणे राजकीय भोळेपणाचे लक्षण ठरेल. त्यापेक्षाही आज जी एक बातमी आली, ही बातमीच या मागे असण्याची दाट शक्यता आहे… ही बातमी म्हणजे नवाब मलिक यांच्या जामिनासाठी थेट दुबईतून फोन आला आणि त्याने 3 कोटी रुपये बीटकॉइनच्या स्वरूपात मागितले, अशी तक्रार नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक याने पोलिसांकडे केली आहे. म्हणजे नवाब मलिक यांना जामीन मिळावा अशी “दुबईची इच्छा” आहे, पण त्यासाठी दुबईतल्या “मिडिल मॅन”ला 3 कोटी बिटकॉइनच्या रूपात हवे आहेत.

 दुबईतून फोनच्या बातमी मागे नेमके कोण?

या बातमीतून साध्य काय झाले…?? नबाब मलिक यांची ईडीच्या न्यायालयीन कोठडीत सुटका झाली का…?? ती तर झाली नाहीच, उलट नवाब मलिक यांच्या जामिनासाठी दुबईहून फोन आला, या बातमीमुळे त्यांचे राजकीय पंख छाटण्याची सोय झाली आणि तसे पवारांनी नवाब मालिकांचे पंख छाटले…!! मलिकांची खाती काढून त्यांना बिनखात्याचे मंत्री ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला.

म्हणूनच प्रश्न पडतो बातमी पेरली कुणी?

पवारांनी तर नवाब मलिकांचे पंख छाटले. म्हणूनच प्रश्न हा पडतो की, नवाब मलिक यांच्या जामीनासाठी दुबईतून फोन आला… ही बातमी नेमकी पेरली कुणी…?? आणि कशासाठी…?? आणि खरंच नवाब मलिक यांच्या जामिनासाठी दुबईतून फोन आला असेल तर त्यातून “धोका” कोणाला उत्पन्न होतो…??

या प्रश्नांची उत्तरे अजून मिळालेली नाहीत…!! पण ही उत्तरे तर्काच्या आधारे शोधायला गेली तर तर ती कोणाच्या दिशेने जातील…?? हे ज्याला समजेल त्याला नवाब मलिक यांचे आज राजकीय पंख छाटणे आणि त्यांच्या जामिनासाठी दुबईतून फोन येणे या बातमीचा “अन्योन्य राजकीय संबंध” लक्षात येईल…!!

Rana Bhimdevi That was brought by Nawabs; After the phone call from Dubai, Pawar showed “Katraj’s Ghat”

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात