IT Raids Anil Parab : शिवसेनेचे मंत्री अनिल परबांशी संबधित 26 ठिकाणांवर इन्कम टॅक्सचे छापे!!


प्रतिनिधी

मुंबई : ठाकरे – पवार सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने अनिल परब यांच्याशी संबंधित २६ ठिकाणी मुंबई, पुणे, सांगली, रत्नागिरीत छापे घातले आहेत. दापोली येथील जमीन व्यवहार प्रकरणात इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची कारवाई सुरू आहे.अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सदानंद कदम हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या रडारवर आहेत. IT Raids Anil Parab 26 places

रिसॉर्ट बनवण्यासाठी 6 कोटी कॅशमध्ये खर्च

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या छाप्यांमध्ये केबल ऑपरेटर, सरकारी अधिकारी आणि काही व्यावसायिकांचाही समावेश आहे. दापोलीतील एक जागा अनिल परब यांनी 2017 मध्ये खरेदी केली होती. त्या जागेशी संबंधित काही कागदपत्रे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या हाती लागली होती. 2017 ला ही जागा 1 कोटी रुपयांना खरेदी केली होती, ज्याची नोंदणी 2019 ला झाली. ही जागा अनिल परब यांनी 2020 मध्ये एका व्यक्तीला दिली होती. 1 कोटी 10 लाख रुपयांना दिली. याच जागेवर 2017 ते 2020 दरम्यान एक रिसॉर्ट बनवण्यात आला. हे रिसॉर्ट बनवण्यासाठी 6 कोटी कॅशमध्ये खर्च करण्यात आले.

– 100 एकर जमीन मागच्या 7 वर्षात खरेदी

बजरंग खरमाटे यांच्या मालमत्तेचीही माहिती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने मिळवली आहे. खरमाटे यांनी पुणे, सांगली, बारामती आणि एका ठिकाणी 100 एकर जमीन मागच्या 7 वर्षात खरेदी केली. काही शॉप्स आणि आलिशान बंगल्याची माहितीही आयकर विभागाने इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने मिळवली आहे.

– बनावट कंत्राटे

बनावट कंत्राटांच्या माध्यमातून 27 करोड रुपये मिळवल्याची देयके तसेच बारामती परिसरातील जमिनीची 2 करोड रुपयांची रिसिप्ट मिळवली आहे तसेच छाप्यात 66 लाखांची रोख रक्कम इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने जप्त केली आहे. डिजिटल पुरावे आणि कागदपत्रे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने मिळवली आहेत.

IT Raids Anil Parab 26 places

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात