प्रतिनिधी
मुंबई – अयोध्येतील राम जन्मभूमी कथित जमीन घोटाळा प्रकरणात एकीकडे आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग हे कोर्टात जाण्याच्या तयारीत असताना; दुसरीकडे मात्र, राम जन्मभूमी मंदिराच्या कट्टर समर्थक दोन हिंदुत्ववादी पक्षांमध्ये घमासाना होताना दिसते आहे. Ram temple land purchse; AAP leader to go to court; fight between two hindutva parties
राम जन्मभूमी मंदिराचे काम जोरात सुरू आहे. त्यामध्ये विविध मार्गांनी अडथळा कसा आणता येईल हे काही पक्ष आणि काही नेते पाहात आहेत. त्यावेळी हिंदुत्ववादी पक्षांनी एकजूट दाखविणे अपेक्षित असताना शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते मात्र एकमेकांवर तुटून पडताना दिसत आहेत.
मूळात कथित जमीन घोटाळ्याचा आरोप केला, आम आदमी पक्षाच्या खासदाराने. त्या पक्षाविरोधात एक शब्दही न उच्चारता मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला शिवसेना भवनावर. तिथे राडा झाला शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये. आणि आता दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना शांत करून हिंदुत्वाची एकजूट दाखविण्यापेक्षा दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर तुटून पडले आहेत.
शिवसेनेने औरंगजेबी वृत्ती दाखविली अशी टीका भाजपचे नेते आशिश शेलार यांनी केली आहे. तर आले अंगावर तर घेऊ शिंगावर, असा इशारा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.
भाजपचे नेते माजी खासदार नितेश राणे यांनी शिवसेनेला जशास तसे उत्तर मिळेल, असे प्रत्युत्तर दिले आहे. भाजपने आम आदमी पक्षाविरोधात चकार शब्द न काढता सामनात राम जन्मभूमी कथित घोटाळ्यासंदर्भात बातमी छापल्याबद्दल शिवसेनेविरोधात फटकार मोर्चा काढला. त्याला शिवसेनेने फटकारेने प्रत्युत्तर दिले. पण दोन हिंदुत्ववादी पक्षांमध्ये कलगीतुरा लावून आम आदमी पक्ष नामानिराळा राहिला आणि त्याचे खासदार कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App