राम जन्मभूमी कथित घोटाळा; आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग कोर्टात जाण्याच्या तयारीत

वृत्तसंस्था

नवी दिल्ली – अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरासाठी खरेदी केलेल्या जमीन व्यवहारात घोटाळा झाल्याचा आरोप करणारे आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग हे कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत. GoI & BJP to take action after I revealed this scam (regarding Ayodhya Ram Temple construction). I’ve understood that BJP’s faith lies in property dealers/corrupters and not in Lord Ram

राम जन्मभूमी मंदिरासाठी जमीन खरेदीत घोटाळा झाल्याची कागदपत्रे दाखवून तीन दिवस झालेत. पण भाजप किंवा विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी त्यावर कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही किंवा कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे या प्रकरणात कोर्टात दाद मागण्याचा निर्णय घेतल्याचे खासदार संजय सिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.भाजप आणि विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांचा भगवान रामावर विश्वास नाही, प्रॉपर्टी डीलर्स आणि जमीन व्यवहारात घोटाळे करणाऱ्यांवर त्यांचा विश्वास आहे, असा दावा संजय सिंग यांनी केला.

तीन दिवसांपूर्वी संजय सिंग यांनी काही कागदपत्रे दाखवून राम जन्मभूमी मंदिरासाठी प्रत्यक्षातल्या २ कोटी रूपयांची जमीन १८ कोटी रूपयांना खरेदी केल्याचा दावा केला होता. राम जन्मभूमी ट्रस्टचे चिटणीस चंपत राय यांनी तो आरोप फेटाळला होता. तरीही विश्व हिंदू परिषदेने काही कारवाई केली नसल्याचा दावा संजय सिंग यांनी आज केला आहे. मात्र, आता कोर्टात ही लढाई जाणार आहे. त्यातून राम मंदिराच्या बांधकामात अडथळा आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा देखील प्रत्यारोप होतो आहे.

GoI & BJP to take action after I revealed this scam (regarding Ayodhya Ram Temple construction). I’ve understood that BJP’s faith lies in property dealers/corrupters and not in Lord Ram