Fact Check : कोव्हॅक्सिनमध्ये नवजात वासराच्या रक्ताच्या अंशाचे मेसेज चुकीचे, नेमकी कशी बनते लस, जाणून घ्या सत्य!

Fact Check : Final vaccine product of COVAXIN does NOT contain new born calf serum Claims are misrepresenting facts

COVAXIN does NOT contain new born calf serum : कोव्हॅक्सिन लस तयार करताना वापरलेल्या संयुगाबाबत काही समाज माध्यमांवर पोस्ट्स व्हायरल होत आहेत. या पोस्टमध्ये असे सूचित करण्यात आले आहे की कोव्हॅक्सिन लसीमध्ये नवजात वासराच्या रक्तामधील अंश (सिरम) समाविष्ट आहे. तथापि, या पोस्टमध्ये तथ्य चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले आहे आणि दिशाभूल करण्यात आली आहे. Fact Check : Final vaccine product of COVAXIN does NOT contain new born calf serum Claims are misrepresenting facts


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोव्हॅक्सिन लस तयार करताना वापरलेल्या संयुगाबाबत काही समाज माध्यमांवर पोस्ट्स व्हायरल होत आहेत. या पोस्टमध्ये असे सूचित करण्यात आले आहे की कोव्हॅक्सिन लसीमध्ये नवजात वासराच्या रक्तामधील अंश (सिरम) समाविष्ट आहे. तथापि, या पोस्टमध्ये तथ्य चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले आहे आणि दिशाभूल करण्यात आली आहे.

काय आहे सत्य…

नवजात वासराच्या रक्तातील अंश केवळ व्हेरो पेशी तयार करण्यासाठी / वाढीसाठी वापरला जातो. विविध प्रकारचे बोवाइन आणि अन्य प्राण्यांमधील रक्ताचे अंश हे व्हेरो पेशींच्या वाढीसाठी मानक संवर्धक घटक मानले जातात. व्हेरो पेशींचा उपयोग पेशींचे जीवन स्थिरावण्यासाठी केला जातो, ज्याची लस तयार करण्यात मदत होत असते. हे तंत्रज्ञान दशकांपासून पोलिओ, रेबिज आणि एन्फ्लूएन्झा लसींमध्ये वापरण्यात आले आहे.

नवजात वासराच्या रक्तातील अंश व्हेरो पेशींमध्ये वापरल्यानंतर तो त्यातून काढून टाकण्यासाठी व्हेरो पेशींच्या वाढीनंतर, त्या पेशी पाण्याने, रसायनांचा वापर करून धुतल्या जातात (त्यांना तांत्रिकदृष्ट्या बफर म्हणूनही ओळखले जाते). त्यानंतर विषाणू वाढीसाठी या व्हेरो पेशींना कोरोना विषाणूची लागण केली जाते.

विषाणू वाढीच्या प्रक्रियेमध्ये व्हेरो पेशी पूर्णतः नष्ट केल्या जातात. त्यानंतर हा वाढलेला विषाणू नष्ट (निष्क्रिय) केला जातो आणि त्याचे शुद्धीकरणदेखील केले जाते. त्यानंतर हा निष्क्रिय केलेला विषाणू अंतिम लस तयार करण्यासाठी वापरला जातो आणि लसीच्या अंतिम रूपात वासराच्या द्रवाचा मुळीच वापर केला जात नाही.

म्हणूनच, अंतिम लसीमध्ये (कोवॅक्सिन) नवजात वासराच्या रक्तातील अंश (सिरम) मुळीच नसतो आणि वासराच्या रक्तातील अंश हा लसीच्या अंतिम उत्पादनाचा घटकही नसतो.

Fact Check : Final vaccine product of COVAXIN does NOT contain new born calf serum Claims are misrepresenting facts

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात