विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी हे गंभीरपणे काम करत नाहीत हे त्यांच्याच पक्षातील लोक का म्हणतात याचे कारण उघड झाले आहे. ऐन कसोटीच्या क्षणी राहूल गांधी पळपुटेपणा करतात. पक्षासाठी महत्वाच्या प्रसंगीच राहूल गांधी परदेशदौºयावर सुट्टीची मजा घेण्यासाठी निघून जातात, असे दिसून आले आहे. त्यामुळे देशात शेतकरी आंदोलन सुरू असताना नववर्ष साजरे करण्यासाठी राहूल गांधी इटलीला गेले आहेत. Rahul Gandhi’s runaway at the moment of the test
२००४ ते २०१४ या काळात कॉँग्रेसच्या नेतृत्वाखाली संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीचे सरकार होते. या काळात राहूल गांधी बहुतांश वेळा परदेश दौºयावरच राहिले आहेत. पण, त्यावेळी सरकार असल्याने हे दिसून आले नाही. मात्र, कॉँग्रेसचा दोन वेळा लोकसभेत आणि असंख्य वेळा राज्यांमध्ये दारुण पराभव झाल्यावर राहूल गांधी यांचा पळपुटेपणा कार्यकर्त्यांच्या नजरेत भरू लागला आहे.
२०१४ साली लोकसभेत अधिकृत विरोधी पक्ष म्हणूनही स्थान मिळू शकले नाही इतका दारुण पराभव झाला. निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर पहिल्याच वेळी माध्यमांना सामोरे जाताना राहूल गांधी हसत होते. त्यांच्या चेहºयावर पराभवाचा कोणताही विषाद दिसत नव्हता. विशेष म्हणजे निकाल आल्यानंतर कार्यकर्त्यांना पुन्हा उमेद देण्याऐवजी ते लगेच परदेश दौºयावर निघून गेले. भारतीय जनता पक्षाचे सरकार आले होते, कॉँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते गलितगात्र झाले होते. तेव्हा १६ फेब्रुवारी ते १६ एप्रिल २०१५ हे तब्बल दोन महिने राहूल गांधी परदेशात होते. आग्नेय अशियातील देशांमध्ये सुट्टीचा आनंद घेत होते.
२०१४ च्या लोकसभेनंतर पहिलाीच विधानसभा निवडणूक आसाममध्ये झाली. आसाममध्ये कॉँग्रेसचे सरकार होते. त्यामुळे या निवडणुकीत जीव तोडून काम करणे आवश्यक होते. कॉँग्रेसचे तत्कालिन ज्येष्ठ नेते हेमंत बिश्वा शर्मा यांनी एकदा त्यांची भेट घेतली. पक्षाच्या राज्यातील परिस्थितीची माहिती देत होते. या वेळी राहूल गांधी यांचे लक्ष आपल्या कुत्र्याला बिस्किट भरविण्यात होते. हेमंत बिश्वा शर्मा यांचे त्यांनी ऐकूनही घेतले नाही.
त्यामुळेच कॉँग्रेस पक्षात राहण्यात आता अर्थ नाही हे समूजन घेऊन हेमंत बिश्वा शर्मा यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. मात्र, तरीही राहूल गांधी यांना काही वाटले नाही. विशेष म्हणजे आसाम विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर डिसेंबर २०१५ मध्ये राहूल गांधी युरोपमध्ये सुट्टीसाठी निघून गेले. त्यानंतरचा इतिहास सर्वांना माहितीच आहे. कॉँग्रेसचा दारुण पराभव झाला. २०१६ या वर्षामध्ये राहूल गांधी हे प्रामुख्याने परदेशातच होते. आपला वाढदिवस त्यांनी तुर्कस्थानमध्ये साजरा केला होता.
देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशातील निवडणुका फेब्रुवारी २०१७ मध्ये झाल्या. याच वेळी हिमाचल प्रदेश, उत्तराखंडच्याही निवडणुका होत्या. उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यांत सर्वत्र पोहोचण्यासाठी भारतीय जनता पक्षासहित सर्वच राजकीय पक्षांचे नेते रात्रीचा दिवस करत होते. मात्र, राहूल गांधी २०१६च्या डिसेंबरमध्ये नववर्ष साजरे करण्यासाठी युरोपात गेले होते. राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत एखादा दौरा करायचा यापलीकडे आपले काम नाही, असेच राहूल गांधींना जणू वाटत असावे. त्यामुळे हरियाणा, महाराष्टÑाच्या निवडणुकांपूर्वी ते परदेशात सुट्टी साजरी करत होते.]
नव्य कृषि कायद्यांच्या विरोधात सध्या राहूल गांधी बोलत आहेत. मात्र, धक्कादायक म्हणजे गेल्या पावसाळी अधिवेशनात जेव्हा नवी कृषि कायद्यांवर लोकसभेत चर्चा झाली, त्यावेळी राहूल गांधी यांनी चक्क दांडी मारली होती. संपूर्ण पावसाळी अधिवेशनात ते एकदाही लोकसभेत आले नाहीत.
केवळ परदेश दौरेच नव्हे तर भारतात असल्यावरही राहूल गांधी त्यांच्या सुटीची मजा सोडत नाहीत, हे देखील दिसून आले आहे. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार ऐन जोमात असताना राहूल गांधी सिमल्यामध्ये पर्यटन करत होते. मित्र पक्ष असलेल्या राष्टÑीय जनता दलानेच याबाबत त्यांच्यावर टीका केली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App