अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून हिंदूविरोधी जिहादाचा नवा प्रकार, कहाण्यांंमध्ये हिंदू स्त्रियांचे अश्लिल चित्रण


विशेष प्रतिनिधी 

मुंबई : युध्दांच्या काळात एखाद्या समाजाचे खच्चीकरण करण्यासाठी जेत्यांकडून महिलांवर बलात्कार होण्याच्या अनेक घटना इतिहासात आहेत. अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून कहाण्यांमधून हिंदू स्त्रियांचे अश्लिल चित्रण करणारे साहित्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामध्ये हिंदू स्त्रिया आणि मुस्लिम पुरुषांमधील संबंधांची अश्लिल वर्णने करण्यात आली आहेत. Amazon depicting Hindu Women as object of Lust

इंडियन हिंदू वाईफ्स अफेर विथ हर मुस्लीम लव्हर, इंडियन वाइफ चिटिंग : सेक्स विथ नेबर, ह्यचिटिंग वाइफ्स अफेर विथ हसबण्ड्स फ्रेण्ड अशा नावाची पुस्तके किंडलच्या किंडलच्या अनलिमिटेड स्बस्क्रीप्शनमध्ये उपलब्ध आहे. निलिमा स्टीव्हन्स नामक लेखिकेच्या ३५ पानांच्या या पुस्तकाच्या कव्हरवर मुस्लीम पुरुष आणि टिकली लावलेली हिंदू महिला दाखवण्यात आली आहे.

या पुस्तकामध्ये लग्न झालेली हिंदू महिला श्वेता आणि तिची मुस्लीम मैत्रिण रझीया हिचा पती अशरफ यांच्यामधील लैंगिक संबंधांबद्दल अगदी अश्लील भाषेत वर्णन करण्यात आलं आहे. अश्लील वर्णनाबरोबरच या पुस्तकामध्ये शाकाहारी असणारी हिंदू श्वेता ही अशरफमुळे मांसांहार करु लागली असंही सांगण्यात आलं आहे. याच लेखिकेची किंडलवर २० हून अधिक अशाच प्रकारची पुस्तके आहेत.

इंडियन वाइफ चिटिंग : सेक्स विथ नेबर या पुस्तकामध्ये अय्यर कुटुंबतील महिला आणि तिच्या शेजारी राहणाºया मुरर्शिद शेख यांच्यामधील संबंधांबद्दल भाष्य करण्यात आलं आहे. या पुस्तकामध्ये मद्रासी देहविक्री करणारी, हिंदू वेश्या अशा आक्षेपार्ह शब्दांचाही वापर करण्यात आला आहे. चिटिंग वाइफ्स अफेर विथ हसबण्ड्स फ्रेण्डह्ण या पुस्तकामध्येही हिंदू महिला आणि मुस्लीम व्यक्तीमधील संबंधांचे अगदी अश्लील वर्णन करण्यात आलं आहे.

Amazon depicting Hindu Women as object of Lust

सुनिता सारन या नावाच्या लेखिकेच्या पुस्तकातहीजाणून बुजून मुस्लिम पुरुष आणि हिंदू महिला यांच्यातील संबंध दाखविले आहेत. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एक दाढी असणारा पुरुष आणि दोन महिला दिसत आहेत. एका महिलेने साडी नेसलीली असून दुसरी अंगावर चादर ओढून बसलेली दिसत आहे. हा डॉन या महिलांना धमकावून त्यांच्यावर बलात्कार करतो आणि त्याचे व्हिडीओ बनवून दाखवण्याची धमकी देतो अशी कथा या पुस्तकात आहे. या महिलांना डॉनची भिती वाटत असली तरी त्यांना यामध्ये सुख मिळत असतं असंही वर्णन या पुस्तकात आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण