भारताच्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याची उत्सुकता निवडून येण्याची 100 % खात्री असलेल्या भाजपमध्ये जेवढी नाही, त्यापेक्षा प्रचंड उत्सुकता विरोधकांमध्ये आहे आणि विरोधकांचा “फर्स्ट चॉईस” हा शरद पवार आहेत!! स्वतः शरद पवारांनी राष्ट्रपतीपदाचा उमेदवार व्हायला विरोधकांना नकार देऊनही विरोधकांचा “फर्स्ट चॉईस” बदललेला नाही.President Elections : why sharad Pawar is first choice of opposition because he is a cementing force of all opposition parties
याचा अर्थ विरोधी पक्षाच्या नेत्यांना समजत नाही असे नाही, परंतु पवारांना “फर्स्ट चॉईस” ठेवणे ही त्यांची राजकीय गरज आहे. किंबहुना शरद पवारांचा शरद पवारांनी एका प्रश्नाला विचारलेल्या दिलेल्या उत्तरातच त्यांच्या “फर्स्ट चॉइस”चे रहस्य दडलेले आहे.
सिमेंटिंग फोर्सचे रहस्य
शरद पवारांना पत्रकारांनी काही वर्षांपूर्वी काँग्रेसमधल्या गांधी कुटुंबियांच्या राजकीय वर्चस्वाचे रहस्य विचारले होते. त्यावेळी शरद पवारांनी गांधी कुटुंबीय हे काँग्रेस नेत्यांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी “सिमेंटिंग फोर्स” आहेत, असे उत्तर दिले होते. काँग्रेसला जोडून ठेवण्यात गांधी कुटुंबियांचा फार मोठा वाटा आहे. गांधी कुटुंबीय नसतील तर काँग्रेस विस्कळीत होऊन जाईल, असे पवारांचे यावेळी उत्तर होते आणि त्यामध्ये राजकीयदृष्ट्या 100 % टक्के तथ्य आहे. गांधी परिवार हा काँग्रेससाठी खऱ्या अर्थाने “सिमेंटिंग फोर्स” आहे. गांधी परिवारा पैकी कोणी अध्यक्ष नसेल तर काँग्रेस पक्षांमध्ये प्रचंड राजकीय घमासान माजेल हे सांगायला चाणाक्ष शरद पवारांची सुद्धा गरज नाही एवढी ती सर्वसामान्यांना माहिती असणारी वस्तुस्थिती आहे!!
पवार हे विरोधकांचे “सिमेंटिंग फोर्स”
काँग्रेसच्या बाबतीमध्ये गांधी परिवार जसा “सिमेंटिंग फोर्स” आहे, तसेच स्वतः शरद पवार यांच्या वयाच्या 82 व्या वर्षी सर्व विरोधकांचे “सिमेंटिंग फोर्स” बनले आहेत. हे पवार यांच्या “फर्स्ट चॉईस”चे खरे उत्तर आहे!! शरद पवारांची जेष्ठता सर्व विरोधकांच्या आता लक्षात आली आहे. वास्तविक शरद पवारांच्या 75 च्या वेळेला त्यांना राष्ट्रपती पदाची ऑफर देता आली असती. पण विरोधकांनी तेव्हा त्यांना ती ऑफर दिली नव्हती. अर्थात त्या वेळेला मोदी सरकार सत्तेवर आल्यामुळे तेव्हा देखील पवारांना राष्ट्रपती होता आलेच नसते. शिवाय त्यावेळी राष्ट्रपती पदावर काँग्रेसचे प्रणव मुखर्जी होते. शरद पवार यांच्या पेक्षा ते सर्वार्थाने ज्येष्ठ राजकीय नेते होते.
पवारांना आधी सिरीयस ऑफर नव्हती
परंतु पवारांना वयाच्या 80 व्या वर्षापर्यंत कोणत्याच राजकीय पक्षाने सिरीयसली राष्ट्रपतीपदाची ऑफर दिल्याची बातमी नव्हती. पवारांच्या राष्ट्रपतीपदाच्या बातम्या मराठी माध्यमे सुरुवातीला चालवायची आणि नंतर त्याचे अनुकरण हिंदी आणि इंग्लिश माध्यमे करायची हीच त्यावेळी वस्तुस्थिती होती.
सोनिया गांधींची राजकीय मजबूरी
परंतु आता खऱ्या अर्थाने देशातली राजकीय परिस्थिती बदलली आहे. विरोधकांकडे खरंच पवारांच्या उंचीचा नेता उरलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी त्यांच्या आजारामुळे खरंच थकल्या आहेत. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचे राजकीय भवितव्य खऱ्या अर्थाने अधांतरीच आहे. काँग्रेस पक्षाला सध्या कोणतीही दिशा सापडत नाही ही कितीही कटू वाटली तरी वस्तुस्थिती आहे.
या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी शरद पवारांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी सुचवले असेल तर ती त्यांची राजकीय अपरिहार्यता किंबहुना मजबूरी असल्याचे समजून घेतले पाहिजे. सर्व विरोधकांची एकजूट करून त्यांना एकत्र बांधून ठेवण्याची पवारांची ताकद सोनियांना आता मान्य करावी लागली आहे.
ममतांपुढे पंतप्रधानपदाचा काटा
ममता बॅनर्जी यांना देखील शरद पवार हे पंतप्रधानपदाचे स्पर्धक वाटत असल्यामुळे त्यांना राष्ट्रपती करून आपला पंतप्रधान पदाच्या स्पर्धेचा मार्ग मोकळा करावा असे वाटले असल्यास नवल नाही. जी स्थिती ममता बॅनर्जी यांची आहे, तशीच बाकी सर्व विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांची देखील आहे. पवारांच्या नावावर सर्व विरोधकांचे एकमत होणे याचा दुसरा अर्थ पवारांना पंतप्रधान पदाच्या स्पर्धेतून कायमचे बाजूला ठेवणे हा देखील आहे.
अर्थात 2024 मध्ये जेव्हा लोकसभेच्या निवडणुका होतील तेव्हा शरद पवारांचे वय 84 असेल. तेव्हा ते खऱ्या अर्थाने पंतप्रधान पदाचे स्पर्धक उरलेले असतील का?? हा देखील कळीचा आणि गंभीर प्रश्न आहे.
पण तरी देखील एक वस्तुस्थिती नाकारता येणार नाही ती म्हणजे शरद पवार हे वयाच्या जेष्ठता क्रमानुसार सर्व विरोधकांचे आता खऱ्या अर्थाने “सिमेंटिंग फोर्स” बनले आहेत आणि त्यामुळेच सध्या तरी ते राष्ट्रपतीपदासाठी सर्व विरोधकांचे मिळून “फर्स्ट चॉईस” बनले आहेत.
सर्व उमेदवार 80 च्या पलिकडचे
विरोधकांचे सध्याचे दुर्दैव असे की विरोधकांकडे राष्ट्रपती पदाचे सर्व उमेदवार हे 80 वयाच्या पलिकडचे दिसत आहेत. पवारांनी नकार दिल्यानंतर डॉ. फारुख अब्दुल्ला (वय 84), माजी पंतप्रधान देवेगौडा (वय 89) आणि गुलाब नबी आझाद (वय 74) हे राष्ट्रपतीपदासाठी विरोधकांचे चॉइस आहेत. गुलाम नबी आझाद यांचे वय 74 असलेले तरी हमखास हरणाऱ्या निवडणुकीत ते राष्ट्रपतीपदासाठी कसे उभे राहतील??, हाही खरा प्रश्न आहे. डॉ. फारूक अब्दुल्ला आणि देवेगौडा हे वयाची नव्वदी गाठताना राष्ट्रपती पदाचे उमेदवार असतील ही शक्यता तरी विरोधकांना कशी काय वाटू शकते?? त्यांना उमेदवारी देऊन विरोधक सिरियसली राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणार आहेत का?? खरंच प्रश्न पडतोय.
त्यामुळे विरोधकांचा सर्वसंमतीचा उमेदवार खऱ्या अर्थाने अजूनही गुलदस्त्यातच आहे. तो आजच्या ममता बॅनर्जी यांच्या बैठकीत ठरेल का??
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App