भाजप प्रकाश आंबेडकरांच्या टार्गेटवर; पण सेंधमारी काँग्रेस – राष्ट्रवादीच्या वोटबँकेवर…!!


नाशिक – मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजेंबरोबर गेलेले वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आता मुस्लीम आरक्षणासाठी रझा अकादमीबरोबर जाणार आहेत. वंचित बहुजन आघाडी आणि रझा अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने मुस्लीम आरक्षणाच्या मागणीसाठी ५ जुलैला मुंबईत विधिमंडळावर मोर्चा काढण्यात येणार आहे. ही माहिती देताना प्रकाश आंबेडकरांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. prakash ambedkar targets BJP; but trying to sneak into congress – NCP votebank

आधी प्रकाश आंबेडकर हे खासदार संभाजीराजे आणि खासदार उदयनराजे यांच्यावर टीकास्त्र सोडत होते. पण संभाजीराजे यांची राज्यसभेची मुदत संपत असताना त्यांचा कल जसा भाजपकडून राष्ट्रवादीकडे वळू लागला तशी प्रकाश आंबेडकरांची राजकीय भूमिका बदलू लागली. आणि अखेर त्यांनी कोल्हापूरात संभाजीराजे यांच्या मराठा मूक आंदोलनाला हजेरी लावली.एकप्रकारे प्रकाश आंबेडकरांचा बेरजेचे राजकारण करण्याच्या प्रयत्नातला हा एक भाग मानला पाहिजे. कारण मराठा घटकांमधली मतांची टक्केवारी थोडी आपल्याकडे वळली तर प्रकाश आंबेडकरांना हवीच आहे.

आणि आता त्याच्या पुढचे पाऊल त्यांनी मुस्लीम समाजाच्या दिशेने टाकले आहे. मुस्लीम समाजातला एक घटक वंचितच्या व्यासपीठावर असतोच. पण आता प्रकाश आंबेडकरांनी रझा अकादमीच्या दिशेने पाऊल टाकल्याने सुन्नी मुस्लीमांच्या घटकांमधली मतांची टक्केवारी आपल्याकडे वळविण्याचा त्यांचा मनसूबा दिसतो.

पण या सगळ्यातून प्रकाश आंबेडकर नेमके साध्य काय करू इच्छितात…?? ते वंचित – मराठा – मुस्लीम आघाडी करू इच्छितात की मराठा आणि मुसलमानांच्या व्यासपीठावर जाऊन नुसते आपले अस्तित्व दाखवून देऊ इच्छितात…??, हे त्यांनी आता स्पष्ट केले पाहिजे. त्यांना स्वतःला जर वंचित – मराठा – मुस्लीम या राजकीय बेरजेतून काही साध्य करायचे असेल, तर नुसते त्यांच्या व्यासपीठावर जाऊन चालणार नाही. कारण त्या व्यासपीठांवर त्या समाजांच्या पुढाऱ्यांची गर्दी मोठी आहे. त्या समाज घटाकांचे मतांचे वाटे त्यांच्यातल्या त्यांच्यातच वाटले जाणार आहेत. त्यामध्ये प्रकाश आंबेडकरांना मतांचा वाटा कुठून आणि किती मिळणार हा प्रश्नच आहे…!!

शिवाय मराठा आणि मुस्लीमांच्या समाजाचे पुढारी प्रकाश आंबेडकरांना आपापल्या आरक्षण आंदोलनात जरूर सामावून घेतील. त्यांना आंदोलनाच्या व्यासपीठावर सन्मानही देतील. पण खरा मुद्दा पुढचा आहे की या दोन्ही समाजांचे पुढारी प्रकाश आंबेडकरांना आपल्या राजकीय वाटणीमध्ये सामील करून घेतील की नाही…?? खरे म्हणजे हाच कळीचा मुद्दा आहे. आणि प्रकाश आंबेडकरांची पुढची राजकीय वाटचाल त्या राजकीय वाट्यामध्ये सामावून घेण्याच्य़ा किंवा न घेण्याच्या राजकीय चालीवर अवलंबून आहे.

मराठा आणि मुस्लीम समाजाचे पुढाऱी प्रकाश आंबेडकरांना आपल्या राजकीय वाटणीतला कितीसा भाग देणार आहेत… तो त्यांच्या संसदेत पुन्हा पोहोचण्याच्या प्रयत्नांना पुरेसा ठरेल काय…??, हा प्रश्न त्याच्या पुढचा आहे. तूर्तास ही बातमी रंजक आहे, की प्रकाश आंबेडकर हे रझा अकादमीबरोबर जाऊन मुस्लीम आरक्षणासाठी मोर्चा काढणार आहेत…!!

prakash ambedkar targets BJP; but trying to sneak into congress – NCP votebank

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण