नेपाळ पोलिसांच्या मारहाणीत आठ भारतीय व्यापारी जखमी

विशेष प्रतिनिधी

काठमांडू – नेपाळ-भारत सीमेवरील महोत्तरी जिल्ह्यात नेपाळ पोलिस आणि भारतीय नागरिक यांच्यात झालेल्या धुमश्च्क्रीत आठ भारतीय व्यापारी जखमी झाले तर एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. Police beaten Indian traders on Nepal border

एका भारतीय व्यापाऱ्याने म्हटले की, निरीक्षक गौतम यांनी सैनिकांना बटाटा, कांदा आणि भाताची आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांना मारहाण करण्याचे आदेश दिले आणि त्यांनी आम्हाला मारहाण करण्यास सुरवात केली.



रायजिंग नेपाळने दिलेल्या वृत्तानुसार, मतिहानी नगरपालिकेत कोरोना संसर्गाची तपासणी करण्यासाठी तात्पुरती चौकी आणि मदतकेंद्र उभारण्यात आले असून त्याची काल भारतीय व्यापाऱ्यांनी मोडतोड केली. त्यानंतर नेपाळच्या सशस्त्र पोलिसांनी बळाचा वापर केल्याने आठ भारतीय व्यापारी जखमी झाले.

तसेच एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. मतिहानी सीमा पोलिस चौकीचे पोलिस निरीक्षक बलराम गौतम म्हणाले, की काल रात्री आठच्या सुमारस ५० ते ६० भारतीय नागरिकांनी सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांवर दगडफेक केली. भारतीय नागरिकांनी मद्यपान केले होते, असा दावा नेपाळ पोलिसांनी केला. सैनिकांच्या डोक्याला गंभीर मार लागला असल्याचे वृत्तात म्हटले आहे.

Police beaten Indian traders on Nepal border

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात