केरळ बिशप्स कौन्सिलकडून मोदी – पोप फ्रान्सिस भेटीचे विशेष स्वागत; लव्ह जिहाद वादाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण घटना


वृत्तसंस्था

तिरुवनंतपुरम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हॅटिकन सिटीमध्ये पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. या भेटीच्या वेळी दोन्ही नेत्यांमध्ये सामाजिक सौहार्द या विषयावर व्यापक विचार विनिमय झाला. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांना पोप फ्रान्सिस यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले. हे निमंत्रण पोप फ्रान्सिस यांनी स्वीकारले असून ते लवकरच भारत भेटीवर येणार आहेत.PM Modi’s meeting with Pope Francis today is indeed a very joyous & landmark occasion for all of us

पंतप्रधान मोदी आणि पोप फ्रान्सिस यांच्यातील भेटीचे केरळ बिशप्स कौन्सिलने स्वागत केले असून पोप यांच्या भारत भेटीमुळे आंतरधर्मीय संवाद वाढून भारताच्या प्रतिमेवर त्याचा सकारात्मक परिणाम होण्याची आशा व्यक्त केली आहे.

त्याचबरोबर पंतप्रधान मोदींनी फ्रान्सिस यांच्या भेटी विषयी दाखविलेल्या आस्थेबद्दल केरळ बिशप्स कौन्सिलने त्यांचे आभारही मानले आहेत.

केरळ मध्ये लव जिहाद सारख्या घटना वाढत असल्याने तिथल्या हिंदू समाजाबरोबरच ख्रिश्चन समाजही प्रचंड अस्वस्थ आहे. ही अस्वस्थता अनेक ख्रिश्चन धर्मगुरूंनी उघडपणे बोलून दाखविली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी पुढाकार घेऊन पोप फ्रान्सिस यांची भेट घेतल्याने केरळ मधल्या ख्रिश्चन समुदायाला विशेष समाधान आणि आनंद वाटला आहे. केरळ बिशप्स कौन्सिलच्या निवेदनात हे स्पष्टपणे प्रतिबिंबित झाले आहे. पोप फ्रान्सिस यांच्या भेटीची समाज अत्यंत आतुरतेने वाट पाहतो आहे. त्यांचे आशीर्वाद भारताला मिळतील आणि भारताची उन्नती होईल, असा आशावाद अभिषेक कौन्सिलने व्यक्त केला आहे.

PM Modi’s meeting with Pope Francis today is indeed a very joyous & landmark occasion for all of us

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*