पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 सप्टेंबर रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतरच व्हाइट हाऊसमध्ये क्वाड नेत्यांनी बैठक होईल. अफगाणिस्तान, इंडो-पॅसिफिक, कोविड-19 आणि वातावरणातील बदल यासारख्या संवेदनशील मुद्द्यांवर चर्चा होईल. PM Modi to meet US President Joe Biden on Sept 24 before QUAD summit
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 सप्टेंबर रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतरच व्हाइट हाऊसमध्ये क्वाड नेत्यांची बैठक होईल. अफगाणिस्तान, इंडो-पॅसिफिक, कोविड-19 आणि वातावरणातील बदल यासारख्या संवेदनशील मुद्द्यांवर चर्चा होईल.
वॉशिंग्टन आणि नवी दिल्लीतील अधिकाऱ्यांनी म्हटले की, पीएम मोदी प्रथम 23 सप्टेंबर रोजी विस्तृत धोरणात्मक भागीदार जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्याशी वेगवेगळ्या द्विपक्षीय बैठका घेतील. नाव न छापण्याच्या अटीवर अधिकाऱ्यांनी सांगितले की, जपानी पंतप्रधान योशिहिदे सुगा आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यासह पंतप्रधान मोदी एका खुल्या, मुक्त, समृद्ध आणि नियम-आधारित इंडो-पॅसिफिक भागात एकत्रित उद्देशांना पुढे नेतील. कारण भारत विविध माध्यमांतून आपली भागीदारी वाढवत आहे.
परिषदेचे सर्व कार्यक्रम व्हाईट हाऊसमध्ये
नुकतेच 11 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे आयोजित प्रथम भारत-ऑस्ट्रेलिया चर्चेच्या सोबत भारताने आपल्या सर्व तीन क्वाड भागीदारांशी टू-प्लस टू संवाद केला आहे. 24 सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी प्रथम अमेरिकन उपाध्यक्षा कमला हॅरिस यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील आणि नंतर ते बायडेन यांची वैयक्तिक पहिल्यांदा भेट घेतील. यानंतर क्वाड समिट सुरू होईल. मिळालेल्या माहितीनुसार, क्वाड समिटचे सर्व कार्यक्रम व्हाइट हाऊसमध्ये होतील.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App