दबंग म्हणून मिरविणारे पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची दबंगगिरी सामान्यांवरच चालते. सत्ताधारी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आमदाराने गोळीबाराचा बनाव करूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार का या प्रश्नावर त्यांची बोलती मात्र बंद झाली. Pimpri-Chinchwad Police Commissioner Krishnaprakash’s dabanggiri on ordinary people, on NCP MLA’s arrest question quiet
विशेष प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड : दबंग म्हणून मिरविणारे पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची दबंगगिरी सामान्यांवरच चालते. सत्ताधारी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आमदाराने गोळीबाराचा बनाव करूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार का या प्रश्नावर त्यांची बोलती मात्र बंद झाली.
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश हे आयर्नमॅन आहेत. वेशांतर करून पोलीस चौक्यांमध्ये जाण्यापासून ते रस्त्यावर फिरणार्याना चोप देत त्यांनी एक दबंग पोलीस अधिकारी म्हणून ओळख मिळविली आहे. कोणत्याही प्रश्नावर आक्रमकपणे बोलून आपण कोणाच्या दबावाला भिक घालत नाही असेही ते सांगत असतात. परंतु, अधिकाऱ्याने कितीही दबंगगिरी केली तरी सत्ताधाऱ्यांपुढे झुकावेच लागते हे पुन्हा दिसून आले आहे.
कृष्णप्रकाश यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबाराचे प्रकरण गाजले होते. परंतु, नंतर बनसोडे यांनीच गोळीबाराचा बनाव केल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे पत्रकारांनी कृष्णप्रकाश यांना प्रश्न विचारला की पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी गोळीबाराचा बनाव केला असेल तर आमदारांवर गुन्हा दाखल करणार का? पत्रकारांच्या या प्रश्नाला कृष्णप्रकार यांनी सोईस्करपणे बगल दिली.
घटनेला आज सात दिवस पूर्ण होतील, तरी देखील हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल असलेला आमदार पुत्र सिद्धार्थ बनसोडेपर्यंत पोलीस पोहचू शकलेली नाही.
आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर कंत्राटदार अँथोनी यांचा मॅनेजर तानाजी पवारसह तिघांवर जीवे मारण्याच्या उद्देशाने आमदार आणि त्यांच्या मुलाच्या दिशेने गोळीबार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी तातडीने तानाजीला अटक केली. पण तीन गोळ्या झाडल्याचा आरोप केला जात असतानाही एकालाही गोळी लागली नाही किंवा गोळीबाराची खूण सापडली नाही. त्यानंतर आमदार बनसोडे आणि तानाजी पवार यांच्यामधील 11 मे रोजी फोनवरुन झालेल्या संवादाची क्लिप समोर आली.
यात आमदार शिवीगाळ करुन तानाजीला धमकावत आहेत. तू उद्या ये मग बघू, असे सांगत आमदारांनी त्यांना धमकाविले आहे. त्यानंतर तपासात अँथोनी यांच्या आकुर्डी येथील कार्यालयासमोर 11 मे रोजी घडलेल्या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले. यात आमदार पुत्र सिद्धार्थ, त्यांच्या पीएसह दहा जणांनी कार्यालयात प्रवेश केला. जमावबंदी कायदा लागू असताना गोंधळ घातला. तानाजी पवार कुठे आहे, ते सांगा असं उपस्थितांना धमकावले. घातक शस्त्राने दोघांवर हल्ला झाला. आमदार पुत्र सिद्धार्थ, त्यांच्या पीएसह दहा जणांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी निगडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला.
तानाजी पवार यांनी देखील पिंपरी पोलिसांनी दोन दिवसांत घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार दिली. घटनेच्या दिवशी आमदारांच्या पीएसह दोघांनी माझे अपहरण केले. आमदारांसमोर मला उपस्थित करण्यात आले. मी काही चुकीचे बोललो असेल तर माफ करा असे विनवले. मात्र, आमदारांचा मुलगा सिद्धार्थने मला कार्यालयातून बाहेर आणले. त्याने साथीदारांसह मला प्रचंड मारहाण केली. जीवाच्या भीतीने मी जवळील पिस्तुलातून हवेत गोळी झाडली. त्यानंतर सगळ्यांनी माझे पिस्तुल हिसकावून घेतले असे तानाजी पवार यांनी म्हटले आहे. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये ही खळबळजनक घटना घडूनही पोलीस गेल्या सात दिवसांपासून कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांचीही बोलती बंद आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App