गोवा एक्सप्रेसमधून ढकलून दिल्याने एकाच मृत्यू , दारूच्या नशेत भांडण ; आरोपीला शिताफीने अटक


वृत्तसंस्था

पुणे : दारूच्या नशेत प्रवाशाबरोबर भांडण करून त्याला धावत्या गोवा एक्सप्रेसमधून बाहेर फेकल्याची घटना सोमवारी घडली. या प्रकरणी नितीन दीपक जाधव (वय 21,श्रीरामपूर ,जिल्हा अहमदनगर) याला रेल्वे पोलिसांनी अटक केली. केडगाव स्थानक परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. Passenger death due to throw from the ‘Goa Express’ by drinked personone arrested

आरोपी नितीन जाधव व मयत गजानन राठोड (वय 33 रा. हिंगोली) हे दोघे गोवा एक्सप्रेसच्या (गाडी क्रमांक 02780) जनरल डब्यांतून प्रवास करत होते. प्रवासात दोघांची ओळख झाली.



काही वेळाने पिण्याच्या पाण्यावरून वाद झाले. दोघेही दारू प्यायले होते. वाद विकोपाला गेल्यावर नितीन जाधव याने राठोडला रेल्वेतून ढकलून दिले. राठोड समोरच्या लोहमार्गवर पडला. त्याचा जागेवर मृत्यू झाला. यावेळी आरोपीने डब्यातील चेन ओढून रेल्वे थांबवली.

त्यावेळी ड्युटीवर असलेले आरपीएफ कर्मचारी विठ्ठल भोसले यांनी त्याला पाठलाग करून पकडले. तेव्हा त्याने सर्व हकीकत सांगितली. केडगाव आरपीएफने त्याला ताब्यात घेऊन लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले.

Passenger death due to throw from the ‘Goa Express’ by drinked personone arrested

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात