Pakistan Vs New Zealand : सुरक्षेच्या कारणास्तव न्यूझीलंड क्रिकेट संघाने पाकिस्तान दौरा रद्द केला आहे. किवी क्रिकेट बोर्डाने हा निर्णय रावळपिंडी येथे पहिला एकदिवसीय सामना सुरू होण्याच्या 30 मिनिटे आधी घेतला. या दौऱ्यात 3 एकदिवसीय आणि 5 टी -20 सामने खेळले जाणार होते. न्यूझीलंडला संघाच्या सुरक्षेशी संबंधित गुप्तचर सूचना मिळाली होती. आता संघाला लवकरात लवकर पाकिस्तानातून बाहेर काढण्याची तयारी केली जात आहे. Pakistan Vs New Zealand Tour Cancelled NZ Team Call Off Pakistan Tour Minutes Before First ODI
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सुरक्षेच्या कारणास्तव न्यूझीलंड क्रिकेट संघाने पाकिस्तान दौरा रद्द केला आहे. किवी क्रिकेट बोर्डाने हा निर्णय रावळपिंडी येथे पहिला एकदिवसीय सामना सुरू होण्याच्या 30 मिनिटे आधी घेतला. या दौऱ्यात 3 एकदिवसीय आणि 5 टी -20 सामने खेळले जाणार होते. न्यूझीलंडला संघाच्या सुरक्षेशी संबंधित गुप्तचर सूचना मिळाली होती. आता संघाला लवकरात लवकर पाकिस्तानातून बाहेर काढण्याची तयारी केली जात आहे.
हा दौरा व्हावा यासाठी पाकिस्तानने सर्वतोपरी प्रयत्न केले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांनाही फोन करून सुरक्षेचे पूर्ण आश्वासन दिले. इम्रान म्हणाले की, पाकिस्तानकडे जगातील सर्वोत्तम गुप्तचर यंत्रणा असून किवी संघाला कोणताही धोका नाही. तथापि, त्यांचे आश्वासनदेखील कुचकामी ठरले आणि न्यूझीलंडने दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
The BLACKCAPS are abandoning their tour of Pakistan following a New Zealand government security alert. Arrangements are now being made for the team’s departure. More information | https://t.co/Lkgg6mAsfu — BLACKCAPS (@BLACKCAPS) September 17, 2021
The BLACKCAPS are abandoning their tour of Pakistan following a New Zealand government security alert.
Arrangements are now being made for the team’s departure.
More information | https://t.co/Lkgg6mAsfu
— BLACKCAPS (@BLACKCAPS) September 17, 2021
पहिला एकदिवसीय सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होणार होता, म्हणजेच नाणेफेक दुपारी 2.30 वाजता होणार होती, पण कोणताही संघ हॉटेलच्या बाहेर आला नाही. खेळाडू आणि सहायक कर्मचाऱ्यांना हॉटेलमध्येच राहण्यास सांगण्यात आले.
पाकिस्तानमधील क्रिकेट संघांची सुरक्षा हा नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. 2009 मध्ये लाहोरमध्ये श्रीलंका संघाच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला होता. यात कोणीही ठार झाले नाही, पण काही खेळाडू जखमी झाले. यानंतर सर्व संघांनी पाकिस्तानचा दौरा थांबवला. पाकिस्तानला यूएईमध्ये आपला सामना खेळणे भाग पडले. गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानने पुन्हा त्यांच्या शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन करण्यास सुरुवात केली, त्यानंतर दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, झिम्बाब्वेसारखे संघही पाकिस्तानमध्ये खेळले.
अलीकडेच तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता काबीज केली आहे. तेव्हापासून पाकिस्तानमध्येही सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी इंग्लंडला पाकिस्तानचा दौराही करायचा आहे. आता इंग्लंडचा संघ जाणार की नाही, हे पाहावे लागेल.
Pakistan Vs New Zealand Tour Cancelled NZ Team Call Off Pakistan Tour Minutes Before First ODI
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App