अफगाणिस्तानाला मानवी मदत मिळावी, पण तालिबानी सत्तांतर सर्वसमावेशक नव्हे; पंतप्रधान मोदींनी शांघाय कोऑपरेशन समिटमध्ये चीन – पाकिस्तानला सुनावले


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतीय आणि अफगाण नागरिकांचे मैत्रीसंबंध शतकानुशतकांचे आहेत. ते कायम राहतील. अफगाणी मित्रांना मानवी मदत मिळायला हवी. पण अफगाणिस्तानात आता झालेले तालिबानी सत्तांतर हे सर्वसमावेशक झालेले नाही, अशा परखड शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांघाय कोऑपरेशन समिटमध्ये पाकिस्तान आणि चीनला सुनावले. India has been Afghanistan’s trusted partner for development&humanitarian help

अफगाणिस्तानात महिला आणि अल्पसंख्यांकासह संपूर्ण अफगाणी समाजाला सत्तेमध्ये प्रतिनिधीत्व मिळाला हवे. त्या देशात कट्टरतावाद कायम राहिल्यास संपूर्ण जगात दहशतवादी विचाराधारांना बळ प्राप्त होईल, असा इशाराही पंतप्रधान मोदी यांनी दिला. त्यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सायंकाळी ‘शांघाय कोऑपरेशन समिट – कलेक्टिव्ह सिक्युरिटी ट्रिटी ऑर्गनायझेशन’च्या (एससीओ – सीएसटीओ) परिषद झाली.

‘एससीओ – सीएसटीओ’ परिषदेतील अफगाणिस्तानविषयक चर्चेस पंतप्रधान मोदी यांनी संबोधित केले. ते म्हणाले, अफगाणिस्तानातील घटनेचा सर्वाधिक प्रभाव हा भारतासारख्या शेजारी देशांवर पडत आहे. त्यामुळे या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रादेशिक सहकार्य अत्यंत गरजेचे आहे. अफगाणिस्तानातील सद्यपरिस्थितीचा विचार करताना चार मुद्दे महत्वाचे ठरतात.

  • अफगाणिस्तानातील संत्तांतर हे वाटाघाटीशिवाय झाले असून त्यात सर्वसमावेशकता नाही. महिला, अल्पसंख्यांकांसह अफगाणी समाजातील सर्व घटकांना त्यात प्रतिनिधीत्व मिळणे आवश्यक आहे.
  • तेथील नव्या व्यवस्थेला मान्यता देण्याचा निर्णय जागतिक समुदायाने अत्यंत विचारपूर्वक आणि सामुहिकपणे घेणे गरजेचे आहे. याविषयी संयुक्त राष्ट्रांच्या केंद्रीय समितीच्या भूमिकेस भारताचा पाठिंबा असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
  • अफगाणिस्तानातील कट्टरतावाद आणि अस्थिरता हा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे. अफगाणिस्तानात अशीच स्थिती कायम राहिल्यास संपूर्ण जगाला दहशतवादाचा धोका निर्माण होईल. त्याचप्रमाणे जगातील अन्य दहशतवादी संघटनांना हिंसेद्वारे सत्तापालटाचे प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे अफगाणी भूमीचा वापर कोणत्याही देशाविरोधात दहशतवादासाठी होणार नाही, हे पाहणे गरजेचे आहे. त्यासाठी एससीओ सदस्यांना कठोर मानके आणि आचारसंहिता व त्याच्या अंमलबजावणीची व्यवस्था निर्माण करावी लागेल.
  • अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात राहून गेलेली अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, अंमली पदार्थ आणि मानवी तस्करीचा यामुळे पूर्ण क्षेत्रात अस्थिरतेचा धोका वाढू शकतो, हा तिसरा महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे या प्रकारावर लक्ष ठेवण्यासाठी एससीओच्या ‘रॅट्स’ प्रणालीचा वापर आवश्यक ठरेल. तसेच या महिन्यापासून भारत या संघटनेच्या काउन्सिलचे अध्यक्षपदी येत असून भारताने या मुद्द्यावर सहकार्य प्रस्ताव तयार केले आहेत.
  • अफगाणिस्तानातील आर्थिक – व्यापारी व्यवस्थेवर दुष्परिणाम हा चौथा आणि शेवटचा मुद्दा असल्याचे पंतप्रधान म्हणाले. भारत अफगाणी जनतेचा विश्वासू भागीदार आहे. आरोग्य, पायाभूत सुविधा, शिक्षण आणि क्षमताबांधणीमध्ये भारताने देशाच्या कानाकोपऱ्यात योगदान दिले आहे. आतादेखील तेथील नागरिकांना अन्न, औषधे पुरविण्यास भारत इच्छुक आहे. त्यामुळे तेथील व्यापारव्यवस्था सुरळीत होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे अफगाणी समाजाच्या मदतीसाठी उभारण्यात येणाऱ्या कोणत्याही प्रादेशिक – जागतिक कार्यक्रमाचा भारत हिस्सा असेल, असेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.

India has been Afghanistan’s trusted partner for development&humanitarian help

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात