ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनात आघाडी सरकार जळून जाईल, सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा


ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या विरोधात भाजपने 26 जून रोजी राज्यव्यापी आंदोनलाची घोषणा केली आहे. या आंदोलनाच्या आगीत राज्यातील महाविकास आघाडी सरकार जळून जाईल असा घणाघात भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. OBC reservation movement will burn Mahavikas Aaghadi Goverment, warns Sudhir Mungantiwar


विशेष प्रतिनिधी

नागपूर : ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या विरोधात भाजपने 26 जून रोजी राज्यव्यापी आंदोनलाची घोषणा केली आहे. या आंदोलनाच्या आगीत राज्यातील महाविकास आघाडी सरकार जळून जाईल असा घणाघात भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने 5 जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. याविरोधात आंदोलनाची घोषणा भाजपाने केली आहे. याबाबत बोलताना मुनगंटीवार म्हणाले, ठाकरे सरकारनं ओबीसी समाजावर अन्याय केलाय, तर मराठा आरक्षण देण्यातही हे सरकार फेल ठरलंय. 26 तारखेच्या आंदोलनात आम्ही प्रतिकात्मक शक्तीप्रदर्शन करणार आहोत. मात्र पुढे हे आंदोलन अधिक तीव्र होईल.महाराष्ट्र सरकार गेल्या 2 वर्षात कोमात असल्याप्रमाणे वागत आहे. ओबीसी आरक्षण टिकवण्यात हे सरकार अपयशी ठरलं. हे सरकार कुंभकणार्पेक्षाही मोठी झोप घेत आहे, अशी टीका करून मुनगंटीवार म्हणाले, इम्पेरिकल डेटासाठी केंद्राकडे बोट दाखवलं जातं. पण मागासवर्गीय आयोग स्थापन करण्यास उशीर का झाला? सरकारचे पितळ उघडं पडू नये म्हणून फक्त दोन दिवसाचं अधिवेशन ठेवण्यात आले.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांकडे या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. सरकारचा डाव असेल की निवडणुका घ्यायच्याच. तर आम्ही या सर्व जागावर फक्त ओबीसी उमेदवार देऊ. मग जिंकलो किंवा हरलो तरी आम्हाला पर्वा नाही. त्या जागा ओबीसींसाठी आरक्षित आहेत असं समजूनच आम्ही त्या निवडणुका लढवू, असे फडणवीस यांनी सांगितले.

OBC reservation movement will burn Mahavikas Aaghadi Goverment, warns Sudhir Mungantiwar

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था