ओबीसी राजकीय आरक्षणावरून ठाकरे – पवार सरकारने भाजपसमोर नांगी टाकली?; झेडपी, पंचायत पोटनिवडणूका पुढे ढकलण्याचा निर्णय??


प्रतिनिधी

मुंबई – ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना भाजपने ओबीसी उमेदवार देण्याचा इशारा दिला आणि ठाकरे – पवार सरकारने त्याच्यापुढे नांगी टाकल्याचे स्पष्ट होत आहे. OBC political reservation in local body elections, thackeray – pawar govt to withdraw the decision to hold the elections

ओबीसींना राजकीय आरक्षण देत नाही, तोवर रा ज्यातल्या झेडपी, पंचायत निवडणूका पुढे ढकल्याव्यात अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यपालांना भेटून केली होती. राज्याच्या मंत्र्यांचीही अशीच भूमिका होती.

या पार्श्वभूमीवर सरकारने नमती भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या राज्यातील ५ जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणूका आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती पोटनिवडणुका पुढे ढकलण्याची विनंती ठाकरे – पवार सरकार राज्य निवडणूक आयोगाला करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र, याची अधिकृत घोषणा सरकारने केलेली नाही.

राज्यात 5 जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती पोटनिवडणूक राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली. देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावरुन दुपारी ठाकरे – पवार सरकारवर जोरदार हल्ला चढविला. त्यांनी राज्यपालांना निवडणूका पुढे ढकलण्याचे निवेदन दिले. त्याचवेळी राज्य सरकारने रेटून या पोटनिवडणूका घेतल्याच तर भाजप सगळे ओबीसी उमेदवार देईल, ही घोषणा केली. हा कमळाचा हा बाण बरोबर ठाकरे – पवार सरकारा लागला.

दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांनीही निवडणूका नको अशी भूमिका घेतली होती. याबाबत आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. त्यात ही निवडणूक पुढे ढकलण्यात यावी यासाठी राज्य सरकार मुख्य सचिवांमार्फत निवडणूक आयोगाला विनंती करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असल्याचे समजते आहे.

OBC political reservation in local body elections, thackeray – pawar govt to withdraw the decision to hold the elections

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात