आता नाना पटोले विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस, टाटांना सदनिका देण्याच्या जितेंद्र आव्हाडांच्या निर्णयावर घेतला आक्षेप


स्वबळाचा नारा देऊन शिवसेनेला अंगावर घेतलेले कॉँग्रेस अध्यक्ष नाना पटोले आता राष्ट्रवादी कॉँग्रेसविरुध्द मैदानात उतरली आहे. बॉम्बे डाईंग परिसरात टाटा रुग्णालयाला सदनिका देण्याच्या निर्णयावर नाना पटोले यांनी आक्षेप घेतला आहे. टाटाला जनतेचा वाटा देण्याची गरज काय? असा सवाल त्यांनी केला आहे. Now NCP against Nana Patole, objected to Jitendra Awhad’s decision to give flats to Tatas


विशेष प्रतिनिधी

जळगाव : स्वबळाचा नारा देऊन शिवसेनेला अंगावर घेतलेले कॉँग्रेस अध्यक्ष नाना पटोले आता राष्ट्रवादी कॉँग्रेसविरुध्द मैदानात उतरले आहेत. बॉम्बे डाईंग परिसरात टाटा रुग्णालयाला सदनिका देण्याच्या निर्णयावर नाना पटोले यांनी आक्षेप घेतला आहे. टाटाला जनतेचा वाटा देण्याची गरज काय? असा सवाल त्यांनी केला आहे.

टाटा कॅन्सर रुग्णालयाला म्हाडाच्या 100 सदनिका देण्याच्या निर्णयाला स्थगिती देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला. राष्ट्रवादीच्या नाराजीमुळे बॉम्बे डाईंग परिसरात टाटा रुग्णालयाला सदनिका देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, आता काँग्रेसकडून जितेंद्र आव्हाड यांच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे. पटोले म्हणाले, राज्य सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत. अशा परिस्थितीत टाटाने आपला सीएसआर फंड वापरावा. टाटाला जनतेचा वाटा देण्याची गरज काय?

टाटा कॅन्सर रुग्णालयाला म्हाडाच्या सदनिका घेण्याचा निर्णय जितेंद्र आव्हाड यांनी घेतला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या सदनिकांच्या चाव्या टाटा रुग्णालयाकडे सुपूर्द करण्यात आल्या होत्या. मात्र, या निर्णयावर महाविकास आघाडी सरकारमध्ये वाद सुरू झाले आहेत. कारण, शिवसेना आमदाराच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांकडून म्हाडाच्या सदनिका देण्याच्या निर्णयावर स्थगिती देण्यात आली. तर आता नाना पटोले यांनी टाटाला जनतेचा वाटा देण्याची गरज काय? असा प्रश्न विचारला आहे.

म्हाडाच्या 100 सदनिका रुग्णांच्या नातेवाईकांसाठी देण्यात आल्या. पण काही स्थानिकांनी विरोध करत शिवसेना आमदारांना साकडे घातल्यावर मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली. मात्र, राष्ट्रवादीच्या नाराजीनंतर त्याच परिसरात आजच्या आज जागा शोधून निर्णय घ्या, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याने बॉम्बे डाईंगमध्ये 100 सदनिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आव्हाड यांनी दिली.

राज्यच नव्हे तर देशभरातून टाटा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी अनेक कॅन्सर रुग्ण येत असतात. मात्र त्यांच्या नातेवाईकांना राहण्याची सोय नसल्याने फुटपाथवरच राहावे लागतं. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय व्हावी म्हणून म्हाडाच्या 100 खोल्या टाटा रुग्णालयाला देण्याचा निर्णय घेतला होता. 16 मे रोजी टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. बडवे यांच्याकडे शरद पवार यांच्या हस्ते या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या होत्या. मात्र, शिवसेनेचे शिवडीचे आमदार अजय चौधरी यांनी याबाबत तक्रार केली होती. मुख्यमंत्र्यांनी चौधरी यांच्या तक्रारीवर तपासून अहवाल सादर करावा तोपर्यंत स्थगिती देण्यात यावी असा शेरा मारत या निर्णयाला स्थगिती दिली होती.

Now NCP against Nana Patole, objected to Jitendra Awhad’s decision to give flats to Tatas

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात