नुपुर शर्मा नामक भाजपच्या निलंबित प्रवक्तीने प्रोफेट मोहम्मद यांच्याबद्दल काही कथित गैरउद्गार काढले काय आणि लगेच इस्लामी कट्टरतावाद्यांनी निमित्त मिळाल्यासारखी आगपाखड सुरू केली आहे. सोशल मीडियामध्ये नुपुर शर्मा विरुद्ध फार मोठे “हेट कॅम्पेन” चालवले जात आहे. अगदी तिचा शिरच्छेद करण्याची भाषा वापरण्यात येत आहे आणि त्यावरची प्रतिक्रिया म्हणून #सपोर्ट नुपुर शर्मा हाही प्रकार सुरू आहे.Nupur Sharma: Selective memory of George Orwell’s “1984” and Nasruddin Shah
पण या पलिकडे जाऊन एक मुद्दा अधिक गंभीर आणि त्यावर चर्चा झाली पाहिजे, असा आहे, तो म्हणजे नुपुर शर्माने केलेल्या प्रोफेट मोहम्मद यांच्याबद्दलच्या वक्तव्याची नेमकी चिकित्सा कोणी करत नाही आणि यानिमित्ताने लिबरल जमात आपल्या “सिलेक्टीव्ह मेमरीसह” नुपूर शर्माविरोधात इस्लामी कट्टरतावाद्यांना “बौद्धिक खाद्य” पूरवत आहे!!, हा आहे.
जॉर्ज ऑरवेलची 1984 कादंबरी
बॉलिवूड अभिनेते नसरुद्दीन शाह यांची यांची देखील या प्रकरणात सिलेक्टीव्ह मेमरी जागृत झाली आहे. नसरुद्दीन शहा हे मोदी सरकारचे पहिल्यापासून विरोधक आहेत हे उघड आहे. नुपूर शर्माच्या वक्तव्याच्या विरोधात एनडीटीव्हीला मुलाखत देताना त्यांची सिलेक्टीव्ह मेमरी विशेषत्वाने जागृत झाल्याचे दिसले. त्यांना अचानक जॉर्ज ऑरवेलची “1984” ही कादंबरी आठवली. या लिबरल लोकांचे एक फार मोठे वैशिष्ट्य आहे, त्यांना सिलेक्टीव्ह मेमरीचे “दैवी वरदान” लाभले आहे!! मुस्लिम समाज घटकाबाबत कोणतीही घटना घडली की या सिलेक्टीव्ह मेमरीतून एकामागोमाग एक असे संदर्भ बाहेर येतात की जणू काही भारतातला सगळ्या मुस्लिम समाज खतऱ्यात आहे, असा समज सगळीकडे पसरला जातो!!
सिलेक्टीव्ह मेमरीतून काय वगळते??
मग हेच लिबरल लोक त्याला “फियर माँजर” वगैरे अशी नावे देतात, पण त्यांच्या सिलेक्टीव्ह मेमरी केरळमधला पीएफचा मोर्चा वगळून जातो. त्यातल्या भारतविरोधी आणि हिंदु धर्मविरोधी घोषणा आपोआपच गळून पडतात. केरळ मध्ये झालेल्या हिंदू शिरकाणाच्या गोष्टी त्यांना तर आठवतच नाहीत. काश्मीर मधल्या हिंदू शिरकाणावर एखादा सिनेमा हिट झाला की तो त्यांना मुस्लिम विरोधी वाटतो, पण मोदी सरकारच्या काळात काश्मीरमधल्या हिंदू अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हत्यांवर मात्र ते लगेच अश्रू ढाळायला लागतात!! सिलेक्टिव्ह मेमरीचे हे फार मोठे वैशिष्ट्य आहे.
एनडीटीव्हीला मुलाखत
नुपुर शर्माच्या निमित्ताने नसरुद्दीन शहा यांनी एनडीटीव्ही दिलेल्या मुलाखतीत या सिलेक्टीव्ह मेमरीची झलक पाहायला मिळते. जॉर्ज ऑरवेलने सन 1949 मध्ये लिहिलेल्या “1984” नावाच्या कादंबरीत काल्पनिक चित्र उभे करून त्या वेळचा समाज कसा दुभंगलेला, कसा दुटप्पी, कसा एकमेकांना पाण्यात पाहणारा, खेकडे मनोवृत्ती असलेला असेल याचे अप्रतिम चित्रण केले आहे. त्या चित्रणाविषयी शंका नाही, पण मुद्दा फक्त इतकाच आहे, की नुपुर शर्माच्या निमित्ताने नसरुद्दीन शहा यांना जॉर्ज ऑरवेलची “1984” ही कादंबरी आठवली, पण हीच कादंबरी त्यांना 1985 च्या शीख हत्याकांडाच्या वेळी आणि 1990 च्या काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाच्या वेळी आठवली नाही. त्यावेळी “हिंदू फियर माँजर” वगैरे शब्द त्यांनी किंवा लिबरल मंडळींनी मीडियामध्ये पेरले नाहीत. एम. एफ. हुसेन यांनी हिंदू देवतांचा अपमान करणारी चित्रे काढली, तेव्हा नसरुद्दीन शाह आणि लिबरल मंडळी ही कलात्मक स्वातंत्र्याचे भोक्ते आणि अविष्कार स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते ठरले होते!! तेव्हा त्यांना जॉर्ज ऑरवेलची “1984” ही कादंबरी आठवली नाही!!
पंतप्रधान मोदींना उपदेश आणि इशारा
पण नुपूर शर्माने प्रोफेट मोहम्मद यांच्या संदर्भात कथित उद्गार काढल्याबरोबर नसरुद्दीन शाह यांना “1984” आठवली!! बरं फक्त ही कादंबरी आठवल्यानंतर नसरुद्दीन शाह यांची सिलेक्टीव्ह मेमरी लॉक झाली नाही, तर त्यांनीच ज्या पंतप्रधान मोदींना सातत्याने विविध मुद्द्यांवर धारेवर धरले आहे त्या मोदींनाच देशात “मुस्लिम हेट” अधिक पसरू नये, समाजामध्ये शांतता संवर्धन आणि मैत्रीचे वातावरण राहावे यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. इतकेच नाही तर त्यांच्या सिलेक्टीव्ह मेमरीतून मोदींना इशाराही दिला आहे. आपण हस्तक्षेप केला नाहीत तर देशातील परिस्थिती अधिक बिघडेल. ती बिघडू देऊ नका, वगैरे उपदेशात्मक इशाऱ्यांनी त्यांची मुलाखत सजली आहे.
आमिर खानचा “असुरक्षित” देश
काही वर्षांपूर्वी समाजसेवक अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांना हा देश राहण्यासाठी देखील “असुरक्षित” वाटत होता. तेव्हा देखील नसरुद्दीन शाह यांची सिलेक्टीव्ह मेमरी आमीर खानच्या आर्ग्युमेंटच्या बाजूने एकदम “ओपन” झाली होती. त्यानंतर बरेच दिवस ही मेमरी सुप्तावस्थेत गेली होती. नुपुर शर्माच्या निमित्ताने ही पुन्हा “ओपन” होऊन तिला देशात “मुस्लिम हेट” वगैरे दिसायला लागले आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App