उद्धव ठाकरे सभा : भाजपवर हल्ला चढवायला सरसंघचालकांच्या भूमिकेचा आधार; पण शरसंधानातून एमआयएमला चलाखीने वगळले!!


नाशिक : संभाजीनगरच्या बहुचर्चित सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज चांगलीच पंचाईत बघायला मिळाली. शिवसेनेच्या हिंदुत्वावर भलेमोठे खुलासे करावे लागले. त्याच वेळी भाजपवर करायला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा आधार घ्यावा लागला आणि आगामी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूक डोळ्यासमोर असल्यामुळे संभाजीनगर मधील महत्त्वाचा मुस्लिम पक्ष आणि शिवसेनेचे कट्टर विरोधक एमआयएम याला शरसंधानातून वगळावे लागले. The basis of Sarsanghchalak’s role in attacking BJP thackeray

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजच्या सभेत राज ठाकरे यांच्या भोंग यांच्या मुद्द्यावर देखील पुसटसा उल्लेख होता. बाकीच्या वक्त्यांनी राज ठाकरे यांच्यावर शरसंधान साधले असले तरी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शरसंधानाचा केंद्रबिंदू भाजप आणि देवेंद्र फडणवीस हेच ठेवले होते. त्यातही भाजपच्या प्रवक्त्यावर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा प्रामुख्याने आधार घेतला. प्रत्येक मशिदी खाली शिवलिंग शोधण्याची गरज नाही, असे सरसंघचालक म्हणाले होते. त्यांच्या भूमिकेचे स्वागत उद्धव ठाकरे यांनी केले. भाजपमध्ये सध्या सुरू असलेले गोंधळ सरसंघचालकांना मान्य आहेत का?, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.

भाजपच्या टिनपाट प्रवक्त्यांमुळे देशाला मान खाली घालायला लागली. पंतप्रधानांचे आणि देशाचे नाव बदनाम होणे आम्हाला मान्य नाही. आमचे मतभेद असतील ते अंतर्गत स्वरूपात सोडवू, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे. मात्र दोनच दिवसांनंतर राज्यसभेची निवडणूक आहे एमआयएम पक्षाच्या तीन मतांची शिवसेनेच्या उमेदवाराला गरज आहे हे लक्षात घेऊन, हिंदू – मुस्लिम द्वेष पसरवला जातो आहे. कोणी औरंगजेबाच्या थडग्यावर डोके टेकून येते आहे, असाच पुसटसा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात केला. एक प्रकारे एमआयएम वर थेट शरसंधान करायचे त्यांनी टाळले. बाकीच्या सर्व भाषणाचा भर भाजप केंद्रित होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभेत अनेक मुद्द्यांना हात घातला. यावेळी बोलताना त्यांनी संभाजीनगरच्या नामांतराच्या मुद्द्यावर देखील वक्तव्य केलं. संभाजीनगर कधी करणार असा प्रश्न विचारला जात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वचन दिलं आहे, ते मी विसरणार नाही, आणि ते केल्याशिवाय रहाणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.



 उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

आधी जे बोंबलतायत त्यांना सांगयचाय एक दीड वर्ष झालं आहे विधानसभेत ठराव मंजूर झालेला आहे. कॅबिनेटने मान्यता दिलेली आहे. सुरुवात म्हणून विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करा असा ठराव आम्ही केंद्राकडे दिला आहे. पण का होत नाही अजून??

या शहराचं नुसतं नामांतर नाही तर संभाजीनगर जेव्हा या शहराचं नामांतर होईल तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना अभिमान वाटेल असं हे नगर करेन असं वचन मी देतो. नावाला सार्थ असं माझं शहर असेल. केंद्राकडे विमानतळाच्या नामांतराचा प्रस्ताव आधी मंजूर करुन घ्या. आम्ही तुमचा सत्कार करू.

संभाजीनगरच्या पाणीप्रश्नावर बोलणार आहे. पाणीप्रश्न असतानासुद्धा तिथे पाठ फिरवण्याऐवजी त्याला सामोरं जातोय. कुठेही फसवेगिरी नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी हा प्रश्न अधिक बिकट होता. दहा दहा दिवसांनी पाणी येत होतं.

तुमच्या मनात येत असेल तुम्ही सांगताय ते आम्ही ऐकतोय पण आमच्या नळाला पाणी नाही. तर तुमचं ओघवतं वकृत्व आमच्या पाण्याचा हंडा भरणार आहे का? पण आता यात सुधारणा झाली आहे,’

झारीतला शुक्राचार बसला आहे तो बाहेर फेका आणि माझ्या संभाजीनगरच्या लोकांना पाणी द्या असं अधिकाऱ्यांना बजावला आहे. एक जुनी योजना होती गंजून सडून गेली आहे, पण तिच्यासाठीही पैसे देत आहे. समांतर जलवाहिनी योजनेचं भूमीपूजन मी केलं होतं, त्याचा पाठपूरावा मी करेन असं मी तुम्हाला वचन दिलं होतं. ही योजना पूर्ण करण्याचं बजावलं आहे. एक पैसा त्या योजनेला कमी पडू देणार नाही.

आक्रोश मोर्चा काढला होता. तो आक्रोश संभाजीनगरकरांच्या पाण्यासाठी नव्हता तर त्यांची सत्ता गेली म्हणून तो आक्रोश होता. आमच्या आधी पाच वर्ष तुम्हीच बसला होतात, का नाही त्यावेळेला योजना सुरु केली. पण प्रत्येकवेळा निवडणुक आली की तुमच्या तोंडावर काहीतरी फेकायचं, हे हिंदुत्व आम्हाला शिकवलं नाही.

रस्त्याच्या कामातही हात घालता आणि रस्त्येही सुधारत आहे. मेट्रोची गरज लागली तर त्यासाठीसुद्धा प्लान बनवण्याची तयारी सुरु आहे. पण शहराचं विद्रुपीकरण करुन मेट्रो करणार नाही. संभाजीनगराची शान वाढवण्याचं काम महाविकास आघाडी करेल हे वचन आज मी तुम्हाला वचन देतो.

The basis of Sarsanghchalak’s role in attacking BJP thackeray

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात