नुपुर शर्मा : भारतावर आक्षेप घेणाऱ्या कतारची एम. एफ. हुसेन गोष्ट आणि लेक्चरबाज इस्लामी देशांचे धार्मिक स्वातंत्र्य!!


भाजपमधून निलंबित केलेल्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर याबद्दल उद्गार काढले त्याबद्दल त्यांनी नंतर माफी मागितली. परंतु या मुद्द्यावरून भारताला घेरण्याचा प्रयत्न करणारे कतार, सौदी अरेबिया, इराण, बहारीन या देशांचे मानवाधिकार आणि धार्मिक स्वातंत्र्य या विषयीचे ट्रॅक रेकाॅर्ड काय सांगते?? हे कोणी नीट बघितले आहे का?? किंबहुना नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यावरून भारताला मानवाधिकार आणि धार्मिक स्वातंत्र्याची लेक्चरबाजी करणारे इस्लामिक देश स्वतः धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवाधिकार नेमके किती पाळतात? याचे एक उदाहरण कतार या देशाच्या वर्तणुकीवर देता येईल.Nupur Sharma: Qatar’s M.A. F. Hussein story and religious freedom of lecturer Islamic countries

कतारची राजनैतिक “प्रगल्भता”

कतारने काल भारतीय राजदूत दीपक मित्तल यांना बोलावून आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली. जेव्हा भारताचे उपराष्ट्रपती त्या देशाच्या दौऱ्यावर आहेत, तेव्हा राजनैतिक पातळीवर भारतीय राजदूतांना बोलवून घेऊन आपण राजनीतैकदृष्ट्या किती “प्रगल्भ” आहोत हे कतारने दाखवून दिले आहे!!



हुसेन पेंटिंग मधून हिंदू देवतांचा अपमान

पण कतारच्या वर उल्लेख केलेल्या उदाहरणाची गोष्ट या राजनैतिक “प्रगल्भतेच्या” पलिकडची आहे आणि ती थेट धार्मिक दुराग्रहातून आलेली आहे. भारताचे प्रख्यात पेंटर एम. एफ. हुसेन यांनी हिंदू देवतांची त्यांच्या परिकल्पनेतली नग्न चित्रे काढली. सरस्वती – लक्ष्मी माता यांना स्वतःच्या कल्पनेतले रूप दिले. भारतामधले लिबरल कलासक्त कलाप्रेमी त्यांच्यावर भलतेच खुष झाले होते. परंतु प्रत्यक्षात एम. एफ. हुसेन यांनी स्वतःच्या कलात्मकतेतून हिंदू देवतांचा अपमान करून हिंदूंच्या भावना दुखावल्या होत्या. त्यावेळी एम एफ हुसेन यांच्याविरुद्ध भारतामध्ये जोरदार निदर्शने झाली होती.

 हुसेन कतारचे नागरिक

त्या वेळी हाच कतार नावाचा देश एम. एफ. हुसेन यांना आश्रय द्यायला पुढे आला होता. 2004 मध्ये कतारच्या अमिरांनी हुसेन यांना आश्रय दिलाच, पण नंतर 2010 मध्ये त्यांना स्वतःच्या देशाचे नागरिकत्व बहाल केले. म्हणजे 2011 मध्ये हुसेन हे जेव्हा निधन पावले तेव्हा ते भारताचे नागरिक नव्हते, तर ते कतारचे नागरिक होते!! एम. एफ. हुसेन पंढरपूर मध्ये जन्माला आले. त्यांनी भारतात पेंटर म्हणून नाव कमावले. पण त्यांनी हिंदू देवतांची अपमानास्पद चित्रे काढली. नंतर ते कतारचे नागरिक झाले आणि लंडनमध्ये निधन पावले!!

 धर्मप्रेम की धर्मवेड?

भारतातल्या लिबरल कलासक्त कलाप्रेमी लोकांना हे वास्तव पचायला जड जाईल. पण कतारच्या धार्मिक स्वातंत्र्याची ही व्याख्या आहे. मोहम्मद पैगंबर याबद्दल कोणतेही गैरउदगार काढता कामा नयेत हे खरेच, पण मग एम. एफ. हुसेन यांनी हिंदू देवतांचा अपमान केल्यानंतर त्यांना राजकीय आश्रय देणे हे कतारच्या कोणत्या धर्म प्रेमात बसते?? हे प्रत्यक्षात ते कतारचे धर्मवेड होते आणि आहे?? याचा विचार केंद्र सरकारने जरूर केला पाहिजे!!

इस्लामी देशांमधील मानवाधिकार

आणि हाच तो कतार आहे, जो मानवाधिकार आणि धार्मिक स्वातंत्र्य याबाबतीत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार निर्देशांकानुसार भारताच्याही खाली आहे. हीच कथा सौदी अरेबिया, बहारीन, इराण या देशांची आहे. या सर्व इस्लामी देशांमध्ये शरिया कायदा चालतो. म्हणजे इस्लाम बाह्य धर्मांना, धार्मिक कृत्यांना तेथे अधिमान्यताच नाही.

 भारतात शरिया कायदा नाही

मग भारतात अशी स्थिती आहे का?? भारतातले लिबरल उघडून डोळे नीट बघणार आहेस का?? की त्यांच्या बुद्धीवर आधीच पडलेली झापडे अधिक घट्ट झाली आहेत?? मोदी सरकार इस्लामी देशांत पुढे झुकले असा डांगोरा भेटून त्यांनी आधीच सोशल मीडियात “दिवाळी” साजरी केली आहे. पण प्रत्यक्षात मोदी सरकार झुकल्याची तरी वस्तुस्थिती आहे का??,

हे देखील त्यांनी पाहिले नाही. मग एम. एफ. हुसेन प्रकरणावर आणि त्यांना कतारने बहाल केले नागरिकत्वावर भारतातले लिबरल काही भाष्य करतील ही अपेक्षा करणे मूळातच चूक आहे. पण नुपूर शर्माच्या निमित्ताने भारताला लेक्चरबाजी करणाऱ्या या इस्लामी देशांमधली मानवाधिकार आणि धार्मिक स्वातंत्र्य यांची स्थिती आंतरराष्ट्रीय पातळीवर चव्हाट्यावर आली हे ही नसे थोडके!!

Nupur Sharma: Qatar’s M.A. F. Hussein story and religious freedom of lecturer Islamic countries

महत्वाच्या बातम्या 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात