शेतकरी आंदोलनात विरोधी पक्ष घेतोय राजकीय पोळी भाजून… निर्मला सितारामन यांचा आरोप

विरोधी पक्षाचे नेते आपली राजकीय पोळी भाजून घेत आहेत. शेतकºयांचे आंदोलन देशविरोधकांकडून हायजॅक करण्यात आले आहे असा आरोप केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सितारामन यांनी केला आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राजकीय फायद्यासाठी शेतकºयांचा वापर करून घेतला जात आहे. शेतकºयांचे आंदोलन विरोधी पक्षाचे नेते आपली राजकीय पोळी भाजून घेत आहेत. शेतकºयांचे आंदोलन देशविरोधकांकडून हायजॅक करण्यात आले आहे असा आरोप केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सितारामन यांनी केला आहे. Nirmala Sitharaman farmers protest news

डाव्या पक्षांकडून शेतकरी आंदोलन हायजॅक

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सितारामन म्हणाल्या, आंदोलनकर्त्या शेतकºयांनी राजकारणासाठी त्यांचा फायदा करून घेणाºयांपासून स्वत:ला ठेवावे. कृषी क्षेत्रात होत असलेले हे बदल शेतकºयांच्या हिताचेच आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकºयांना दिला. मात्र तरी या कायद्यामुले आपलं नुकसान होईल, असं वाटतं आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनीदेखील शेतकºयांशी चर्चा केली. मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. पुढील चचेर्साठी सरकार सदैव तयार आहे. पण आता या आंदोलनात कृषीसंबंधी मुद्दे मागे पडत असल्याची भीती आहे. शेती आणि शेतकºयांसंबंधी मुद्दे आता आंदोलनात मांडले जात नाही आहे. देशविरोधी घटकांना हवा दिली जाते आहे. शेतकरी आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे.

Nirmala Sitharaman farmers protest news

शेतकºयांच्या मागण्यांबाबत बोलताना अर्थमंत्री म्हणाल्या, केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर आणि पियुष गोयल शेतकºयांशी चर्चा करून यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न करत आहेत. पुन्हा मागे जाणं हेदेखील तितकं चांगलं नाही. आम्ही त्यांच्याशी बोलणं थांबवलेलं नाही आणि शेतकरी म्हणून आमच्याशी चचेर्साठी ते कधीही येऊ शकतात. जो मुद्दा आता उपस्थित केला जातो आहे ते कृषी क्षेत्रासाठी चिंतेचा विषय नाही. शेतकºयांनी मंत्र्यासोबत शांतपणे बसून यावर चर्चा करावी आणि ही समस्या सोडवावी असी माझी विनंती आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात