संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची शिष्टाई; शेतकऱ्यांनी उत्तर प्रदेश सीमेवरील वाहतूक केली सुरू

चिल्ला सीमेवर धरणे आंदोलन करत असलेल्या शेतकºयांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याशी चर्चा केली.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची शिष्टाई यशस्वी झाली आहे. गेल्या बारा दिवसांपासून शेतकऱ्यांनी बंद केलेला दिल्ली-नोएडा रस्त्यावरील चिल्ला सीमेवरील वाहतूक सुरू केली आहे. चिल्ला सीमेवर धरणे आंदोलन करत असलेल्या शेतकºयांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर शेतकºयांनी चर्चा करून वाहतूक सुरू करण्यात आली. Protesting farmers open Chilla border for traffic after meeting rajnath singh

राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी शेतकºयांची पाच सदस्यीय टीम चर्चेसाठी गेली होती. या वेळी कृषि मंत्री नरेंद्रसिंह तोमरही उपस्थित होते. त्यांनी आपल्या १८ विविध मागण्या मांडल्या. यामध्ये मुख्य मागणी शेतकरी गठन आयोगाची होती.मात्र, यामध्ये एमएसपीचा उल्लेख नव्हता.

Protesting farmers open Chilla border for traffic after meeting rajnath singh

एका शेतकºयाने सांगितले की आमचे नेते आज संरक्षण मंत्री आणि कृषि मंत्र्यांना भेटले. त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की आमच्या मागण्या मान्य करण्यात येतील. त्यामुळे आम्ही रस्ता उघडण्यास परवानगी दिली आहे. यामुळे रात्री उशिरा नोएडाहून दिल्लीला जाणाºया रस्त्यावरील अडथळे हटविण्यात आले. वाहनचालकांनी या रस्त्याचा वापरही सुरू केला आहे. चिल्ला बॉर्डर बंद असल्याने वाहनचालकांना दिल्ली जाण्यासाठी डीएनडी आणि कालिंदी कुंजहून जावे लागत होते.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*