विशेष प्रतिनिधी
पुणे : जिल्ह्यातील पुण्यातील वडगावशेरीमध्ये एका कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज उपस्थित होते. या कार्यक्रमात अजित पवार बोलत असताना जवळच्या मशिदीत अजान सुरु झाली. नमाज पठण केलं जात असल्याचा आवाज येताच अजित पवारांनी आपलं बोलणं थांबवलं. सकाळ ने हा व्हिडिओ ट्विट केला आहे.NCP: Ajit Pawar stopped his speech as soon as Ajaan started …
पुणे महानगरपालिकेची मुदत आज संपते आहे. नगरसेवकांनी केलेल्या विकासकामांच्या उदघाटनाची लागबग काल दिवसभर पाहायला मिळाली.
अजान सुरु होताच अजित पवारांनी थांबवलं भाषण…@AjitPawarSpeaks @NCPSpeaks #sakalnews pic.twitter.com/Wg06jgcohQ — SakalMedia (@SakalMediaNews) March 13, 2022
अजान सुरु होताच अजित पवारांनी थांबवलं भाषण…@AjitPawarSpeaks @NCPSpeaks #sakalnews pic.twitter.com/Wg06jgcohQ
— SakalMedia (@SakalMediaNews) March 13, 2022
त्यानंतर काही काळ कार्यक्रमाला उपस्थित सारेच शांत झाले होते.
त्यानंतर पुढच्या काही वेळात अजान संपताच पवारांनी भाषणाला सुरुवात केली. यावेळेस नागरिकांनी देखील टाळ्या वाजवत अजित पवारांनी जपलेल्या सामाजिक बांधिलकीला प्रतिसाद दिला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App