वृत्तसंस्था
मुंबई : राज्यात कोरोना संसर्गाचा दर दोन टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. २९ हजार सक्रिय रुग्ण असून लसीकरणाचा चांगला परिणाम दिसू लागला आहे. लसीकरणाची वाटचाल १०० कोटी डोस देण्याकडे झाली आहे. दरम्यान, राज्यात नगर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरीत सक्रिय रुग्णांची संख्या अधिक आहे. Nagar, Sangli, Satara, Sindhudurg, Ratnagiri have more active patients; Relief in the state as infection decreases
नगर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरीत सक्रिय रुग्णांची संख्या अधिक आहे. विदर्भ, मराठवाड्यात फारसे रुग्ण नाहीत. सध्या संसर्ग दर दोन टक्क्यांपेक्षा कमी झाल्याने दिलासादायक वातावरण आहे, असे आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले.
राज्यात कोरोनाचे २९ हजार सक्रिय रुग्ण आहेत. लसीकरणाचा चांगला परिणाम दिसत आहे. आतापर्यंत ६८ टक्के नागरिकांना पहिला तर ३२ टक्के व्यक्तींना दोन्ही डोस दिले आहेत. मुंबई, पुणे, भंडारा, रायगड अशा काही जिल्ह्यात ९० टक्क्यांहून अधिक लसीकरण झाले.
देशात तिसऱ्या बुस्टर डोस देण्याची गरज भासणार नाही. सध्या सर्वाना दोन डोस देण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. तिसरी लाट लक्षात घेऊन तयारी केली जात आहे. या लाटेत दुसऱ्या लाटेच्या दीडपट बाधित होतील, असा अंदाज देण्यात आला. ते लक्षात घेऊन प्राणवायू, औषधे आदींची तयारी केली आहे. प्राणवायू व्यवस्थापनाबद्दल प्रशिक्षण देण्यात आले. काही महापालिका क्षेत्रात डेंग्यू व चिकुनगुनियाचा प्रादुर्भाव वाढल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App