मुंबईतून काही घेऊन जायला आलेलो नाही, नवी फिल्मसिटी तयार करायला आलेय, योगी आदित्यनाथ यांनी दिले टीकेला उत्तर


आम्ही मुंबईतून काहीच घेऊन जायला आलेलो नाही. आम्ही नवी फिल्मसिटी तयार करायला आलो आहे. उत्तर प्रदेशमध्ये जागतिक स्तरावरील फिल्मसिटी उभी करणार आहे अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे. mumbai bollywood news


विशेष प्रतिनिधी

मुंबई : आम्ही मुंबईतून काहीच घेऊन जायला आलेलो नाही. आम्ही नवी फिल्मसिटी तयार करायला आलो आहे. उत्तर प्रदेशमध्ये जागतिक स्तरावरील फिल्मसिटी उभी करणार आहे, अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे. mumbai bollywood news

उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या फिल्म सिटीवरून राजकीय वातावरण तापलं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही बॉलिवूडला मुंबई बाहेर नेऊ देणार नसल्याचा इशारा दिला आहे. या सगळ्या प्रश्नांवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं आहे. mumbai bollywood news

योगी आदित्यनाथ म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये जागतिक स्तरावरील फिल्म सिटी उभारण्याची आमची योजना आहे. यासाठी आम्ही या क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत चर्चा केली आहे. ते सुद्धा या फिल्मसिटीसाठी उत्सुक आहेत. या प्रस्तावित फिल्म सिटीसाठी आम्ही नोएडा येथे १ हजार हेक्टर जमीन खरेदी करणार आहोत. फिल्मसिटीची ही जागा जेवर विमानतळाजवळ आहे. या ठिकाणाहून उत्तर प्रदेशसह आणि देशातील इतर भागांशी जोडणारी दळणवळणांची सर्व साधनं असतील.

mumbai bollywood news

बॉलिवूड इंडस्ट्री उत्तर प्रदेशला घेऊन जाणार असल्याच्या चर्चांवर स्पष्टीकरण देताना योगी आदित्यनाथ म्हणाले, आम्ही इथे काहीही घेऊन जायला आलेलो नाहीये. आम्ही नवीन तयार करण्यासाठी आलोय. ही खुली स्पर्धा आहे. समाजाला चांगलं वातावरण देण्याची गरज आहे. ती प्रत्येकानं दिली पाहीजे. मुंबई फिल्मसिटी आपलं काम करेल. यूपीतील फिल्मसिटी त्यांचं काम करेल.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात