दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर एमटीडीसी पर्यटकांसाठी खास सवलती जाहीर केल्या आहेत. तसेच दिवाळी सुट्ट्यांमध्ये निसर्गरम्य ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी महामंडळ सज्ज झाले आहे.MTDC announces various concessions for tourist accommodation in Pune division
विशेष प्रतिनिधी
पुणे : सध्या कोरोनाची दुसरी लाट हळूहळू कमी कमी होत आहे.यामुळे राज्य शासनाने बरेच निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे येणाऱ्या हिवाळी पर्यटनासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) पुणे विभागाने पर्यटकांसाठी विविध सवलती जाहीर केल्या आहेत.
करोना नियंत्रणात आल्याने ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये या तीन महिन्यात मोठ्या प्रमाणात पर्यटन होणार आहे. दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर एमटीडीसी पर्यटकांसाठी खास सवलती जाहीर केल्या आहेत. तसेच दिवाळी सुट्ट्यांमध्ये निसर्गरम्य ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी महामंडळ सज्ज झाले आहे.
गेल्या दीड वर्षापासून काेराेनामुळे पर्यटकांना पर्यटनास मर्यादा येत आहेत. घरी बसून कंटाळलेल्या पर्यटकांना निसर्गाच्या सान्निध्यात निवासाची परवानगी आहे.या पार्श्वभूमीवर महामंडळाने विविध सवलती जाहीर केल्या आहेत.
महामंडळाची पुणे विभागातील सर्व निवासस्थाने सुरू असून,www.mtdc.co या संकेतस्थळावर ऑनलाइन आरक्षण सुरू करण्यात आल्याची माहिती महामंडळाच्या पुणे विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी दिली.
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षेला सर्वाेच्च प्राधान्य देत निवासस्थानांची संपूर्ण स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. निवासस्थानी येणाऱ्या पर्यटकांना तातडीच्या वैद्यकीय कारणांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गरज भासल्यास पर्यटकांच्या मागणीनुसार पर्यटक निवासात औषधाेपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
तसेच हरणे यांनी सांगितले की , शरीराचे तापमान माेजणारी यंत्रणा, जंतुनाशकाची व्यवस्था यापूर्वीच करण्यात आली आहे. महामंडळाच्या बहुतांश कर्मचाऱ्यांचे लसीकरणही पूर्ण करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App