वृत्तसंस्था
बोलपूर : बोलपूर येथे गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा यांच्या रोड शो ला भव्य प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे ममतांच्या पश्चिम बंगालचे वारे सोनार बांगलाच्या दिशेने वाहायला लागले आहे. massive response to amit shah road show in bolpur bengal
घोडेमैदान आता दूर राहिलेले नाही. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप 200 आकडा पार करून सत्तेवर येण्याची चाहूल या रोड शोमधून लागली आहे. massive response to amit shah road show in bolpur bengal
सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हेकेखोर आणि हट्टी स्वभावामुळे त्यांचे निकटवर्तीय नाराज झाले असून हळूहळू ते पक्ष सोडून भाजपला मिळत आहेत. त्यामुळे भाजपचं पक्ष बळ वाढत चालले आहे.
गेली दहा वर्षे सत्तेवर आलेल्या ममतांना जनताही कंटाळली आहे. त्याचे पडसाद या रोड शो मध्ये उमटले. हजारोंच्या संख्येने उत्स्फूर्तपणे लोक रोडमध्ये सहभागी झाले. याचाच अर्थ लोकांना बदल हवा आहे.
– अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App