वर्धापन दिन मार्मिकचा पण भाषण “मार्मिक” की “खुसपटी”!!??


मार्मिकच्या आजच्या वर्धापन दिनाचे मार्केटिंग मराठी माध्यमांनी सकाळपासून चालवले होते. उद्धव ठाकरे कोणावर निशाणा साधणार?? शिंदे गटावर की भाजपवर?? की हळूच आपल्या मित्र पक्षांवर??, असे सवाल विचारणाऱ्या बातम्या माध्यमांनी प्रसिद्ध केल्या होत्या. मार्मिकच्या या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी अपेक्षेबरहुकूम भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या गटावर जरूर निशाणा साधला, पण त्यांचे हे भाषण “मार्मिक” होते की “खुसपटी”??, असे सवाल आता सोशल मीडियावर विचारले जाऊ लागले आहेत.Marmik anniversary : Uddhav Thackeray’s speech Impact full of buffler??

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे “टोमणे बॉम्ब” असतो असे वर्णन करून ठेवले आहे. त्यामुळे टोमण्यांपलिकडे जाऊन उद्धव ठाकरे यांच्या भाषणात काही होते का??, अशाही सवालांवर सोशल मीडियात खुसखुशीत चर्चा सुरू आहे.



भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आडनावावरून उद्धव ठाकरेंनी त्यांना टोला हाणून घेतला. त्यांची 52 का 152 कुळे असतील, ती कुळे खाली उतरली तरी शिवसेना संपणार नाही, अशी भाषा उद्धव ठाकरेंनी वापरली आहे. यात टोमणे शिवाय दुसरे काय आहे??

पण मुळात मार्मिक अथवा सामनाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात कायम शिवसेना संपणार नाही, अशी खात्री किंवा ग्वाही तरी का द्यावी लागते?? इतर राजकीय पक्षांचे नेते शत्रू म्हणून अथवा मित्र म्हणून तंबूत शिरून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करत असतील. पण म्हणून खुद्द उद्धव ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांना शिवसेना संपणार नाही, असे वारंवार का म्हणावे लागते??, हा खरा प्रश्न आहे!! शिवसेना संपणार नाही या आत्मविश्वासाची उद्धव ठाकरेंमध्ये कमतरता आहे का??

 उद्धव ठाकरे अद्याप मातोश्रीतच

शिवसेनेचे 40 आमदार फुटून बाहेर पडले. ठाकरे पवार सरकार गेले. शिंदे फडणवीस सरकार आले. त्यानंतर उद्धव ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करणार अशा बातम्या जोरदार झळकल्या होत्या. पण त्यापैकी महाराष्ट्र दौरा सोडाच पण मुंबईतल्या त्यांचा दौरा देखील फारसा कुठे दिसला नाही. मातोश्रीतील समर्थन मेळाव्या च्या बैठकांनंतर नंतर त्यांनी खासदार अरविंद सावंत यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ते मातोश्रीतून बाहेर पडले होते आणि आता मार्मिक च्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने…

दौरे फक्त आदित्यचे

मात्र त्यापलीकडे त्यांचा महाराष्ट्र दौरा अद्याप झालेला नाही. त्या ऐवजी आदित्य ठाकरेच छोटा-मोठा दौरा करून आले. अशा स्थितीत जर एकनाथ शिंदे गटाचे प्रचंड मोठे आव्हान शिवसेनेपुढे उभे असेल, तर 52 कुळे की 152 कुळे किंवा जे. पी नड्डा यांना सगळे प्रादेशिक पक्ष संपवायचेच आहेत. पण त्यांना ते संपवता येणार नाहीत. शिवसेना संपणार नाही, अशी भाषा वापरून शिवसेना कशी उभारी धरणार आहे?? ती फक्त मातोश्री वर बसून मेळावे बैठका घेऊन आणि मुंबईतल्या एखाद दुसऱ्या कार्यक्रमांना हजेरी लावून दुसऱ्या कार्यक्रमांना हजेरी लावून मार्मिक भाषणांऐवजी “खुसपटी” आणि “टोमणेमारू” भाषणे करून शिवसेना टिकणार आहे का??, हा खरा लाख मोलाचा आहे!!

Marmik anniversary : Uddhav Thackeray’s speech Impact full of buffler??

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात