बावनकुळेंच्या मुख्यमंत्री पदाचा उल्लेख करून गडकरींचा “राजकीय बॉम्ब”; पण शिंदेंच्या खुर्चीखाली की फडणवीसांच्या??


प्रतिनिधी

नागपूर : महाराष्ट्रात ठाकरे पवार सरकार जाऊन महिना उलटत आहे शिंदे फडणवीस सरकारचा नुसताच विस्तार झाला आहे पण खातेवाटप अजून बाकी आहे तेवढ्यात नितीन गडकरी यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य करून देवेंद्र फडणवीस यांना “राजकीय फाऊल” करण्याचा प्रयत्न केला आहे. Gadkari’s “political bomb” referring to Bawankule’s post as chief minister

चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यावर त्यांचा सत्कार करण्यासाठी नागपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात आपल्या नेहमीच्या मिश्कील शैलीत तुफान फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी फडणवीस जर केंद्रात गेले तर बावनकुळेंचा मुख्यमंत्रीपदासाठी विचार होऊ शकतो, असे वक्तव्य गडकरी यांनी करून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

आता बावनकुळे यांचे नाव घेऊन विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्ची खाली राजकीय बॉम्ब लावला आहे, की देवेंद्र फडणवीस यांची राजकीय महत्त्वाकांक्षा छाटण्याचा प्रयत्न केला आहे हे येणारा काळच ठरवणार आहे पण यानिमित्ताने खुद्द नितीन गडकरींची मात्र मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा पूर्ती विरघळून गेली आहे, हे मात्र निश्चित!!

काय म्हणाले गडकरी?

आपल्यामधील एक कार्यकर्ता आज महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहे. जो पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होतो तो पुढे काय काय होतो हे तुम्हाला माहीतच आहे. म्हणजे मी बावनकुळे यांना मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा देत नाहीय. नाहीतर आजकाल प्रसारमाध्यमं मी जे बोललो नाही ते सुद्धा माझ्या नावावर खपवतात. मुख्यमंत्री हे फडणवीसच झाले पाहिजेत, पण फडणवीस जर का केंद्रात गेले तर बावनकुळे यांचा मुख्यमंत्री पदासाठी विचार होऊ शकतो, असं नितीन गडकरी म्हणाले आणि सभागृहात एकच हास्यकल्लोळ उडाला.

एका सामान्य कार्यकर्त्याचा सन्मान

बावनकुळे यांना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यामुळे त्यांना आगामी काळात पक्षाची सेवा करण्याची नामी संधी आहे. पिता-पुत्र किंवा आई-मुलाचा भाजप हा पक्ष नाही. एक रिक्षाचालक असलेला सामान्य माणूस आज महाराष्ट्राचा अध्यक्ष झाला तो आपल्या कर्तृत्वाने, हे खरं भाजपचे वैशिष्ट्य आहे. एका सच्चा कार्यकर्त्याचा सन्मान होणे ही फडणवीस आणि माझ्यासारख्या सर्वच कार्यकर्त्यांसाठी आनंदाची बाब आहे, असंही नितीन गडकरी यावेळी म्हणाले.

Gadkari’s “political bomb” referring to Bawankule’s post as chief minister

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात