म्यानमारमधील विद्यापीठांतून हजारो शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. लष्कराच्या विरोधात निदर्शने करणााºया शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या विरोधात लष्कराने कारवाई सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून हजारो शिक्षकांचे निलंबन करण्यात आले आहे. म्यानमारमध्ये पंतप्रधान आॅग स्यू की यांची सत्ता उलथवून लष्कराने ताबा मिळविला आहे. कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षभरापासून म्यानमारमधील शिक्षणसंस्था बंद होत्या. Many suspended from universities in Myanmar, professor-student conflict with the military
प्रतिनिधी
रंगून : म्यानमारमधील विद्यापीठांतून हजारो शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. लष्कराच्या विरोधात निदर्शने करणााºया शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या विरोधात लष्कराने कारवाई सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून हजारो शिक्षकांचे निलंबन करण्यात आले आहे.
म्यानमारमध्ये पंतप्रधान आॅँग स्यू की यांची सत्ता उलथवून लष्कराने ताबा मिळविला आहे. कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षभरापासून म्यानमारमधील शिक्षणसंस्था बंद होत्या. म्यानमारमधील लष्कराच्या विरोधात येथील शिक्षकांनी निदर्शने सुरू केलीआहेत. त्यामुळे ११ हजारांहून अधिक शिक्षकांना लष्कराने निलंबित केले आहे. एका शिक्षकाने सांगितले की माझी नोकरी गेली असल्याचे दु:ख आहे मात्र अन्यायाच्या विरोधात उभे राहू शकलो हे माझ्यासाठी गौरवाचे आहे .
या शिक्षकाने सांगितले की माझ्या शिक्षणसंस्थेकडून कामावर हजर राहण्याची नोटीस देण्यात आली होती. मात्र, मी त्याला नकार दिला. आम्ही लष्करशाहीचे आदेश पाळू इच्छित नाही. अमेरिकेत फेलोशिपवर असलेल्या एका प्राध्यापिकेला सांगण्यात आले की तिने निदर्शनांना जाहीर विरोध करावा अन्यथा नोकरी सोडावी लागेल. तिच्या विद्यापीठाने सांगितले की प्रत्येकावर लक्ष ठेवले आहेत. लष्करी सत्ता किंवा निदर्शने यांच्यापैकी एकाची निवड करायची आहे. बहुतांश प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी लष्कराच्या दडपशाहीला घाबरून आपले नाव सांगण्यास नकार दिला आहे. मात्र, किती जणांना निलंबित करण्यात आले आहे याबाबत कोणतीही माहिती नाही.
इतर बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App