नाशिक : Sambhaji Raje फक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट करून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेले मनोज जरांगे यांच्या पाठिंब्यासाठी किंवा त्यांची निदान वक्रदृष्टी तरी आपल्याकडे वळू नये यासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या रांगा त्यांच्या घरासमोर लागल्या. त्यातून मोठी राजकीय वातावरण निर्मिती जरूर झाली, पण मनोज जरांगे यांना सगळ्यांत वेगळी ऑफर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.Sambhaji Raje
मनोज जरांगे यांनी उमेदवार जरूर उभे करावेत. परंतु ते स्वराज्य पक्षाच्या चिन्हावर उभे करावेत. कारण अपक्ष आमदार निवडून आल्यानंतर नेमके कुठे जातील??, त्यांची गॅरंटी नाही. त्यापेक्षा मनोज जरांगे यांनी स्वराज्य पक्षाला उमेदवारांचा पुरवठा करावा. कारण तो पक्ष त्यांचाच आहे आणि आपला राजकीय शत्रूही समान आहे, असे संभाजीराजे मनोज जरांगे यांना सांगून आले. परंतु, मनोज जरांगे यांनी कोल्हापूरच्या गादीचा मान ठेवत संभाजीराजे यांचे म्हणणे ऐकून घेतले, पण त्यांचा प्रस्ताव मात्र अप्रत्यक्षपणे फेटाळून लावला.
यामागे मनोज जरांगे यांच्या मास्टर माईंडचे जुने लाडके अपक्ष आमदार राजकारण असल्याचेच उघडपणे दिसते आहे. विद्यमान महाविकास आघाडी जशीच्या तशी निवडणुकीनंतर टिकेल, याची कुठलीही शाश्वती नाही. किंबहुना महाविकास आघाडीला पूर्ण बहुमत मिळून काँग्रेसचाच मुख्यमंत्री लादून घ्यावा लागणार असेल किंवा उद्धव ठाकरेंचा हट्ट पुरवावा लागणार असेल, तर ही महाविकास आघाडी निवडणुकीनंतर टिकवायची तरी कशाला?? त्यापेक्षा आत्ताच अपक्ष आमदारांची बेगमी करून नंतर त्या आधारावर “पॉलिटिकल बार्गेनिंग” करायचा इरादा जरांगे यांच्या मास्टर माईंडने बाळाला असल्यास त्यात आश्चर्यकारक असे काही नाही. कारण 1995 मध्ये हाच अपक्ष आमदारांचा प्रयोग करून आधी झाला होता.
अशावेळी मनोज जरांगे यांच्या मास्टर माईंडला अपक्ष आमदारांची गरज त्याच्या पुढच्या राजकारणासाठी लागत असताना, मनोज जरांगे अनावश्यकपणे स्वतःची ताकद वापरून स्वराज्य पक्षाच्या चिन्हावरचे आमदार कशासाठी वाढवतील??, तसे वाढवून छत्रपती संभाजीराजे यांची ताकद वाढेल, त्यांची “बार्गेनिंग पॉवर” वाढेल, मग मनोज जरांगे यांच्या हातात काय राहील??, त्यापेक्षा अपक्ष आमदारांना व्हीप लागू होवो किंवा न होवो, त्यांचा पुरवठा जर मास्टर माईंडलाच करायचा आहे, तर उगाच कुठल्या पक्षाच्या चिन्हाच्या खोड्यात त्यांना अडकवण्यात काय मतलब आहे??, असा विचार जर जरांगे यांनी केला असेल, तर त्यातही आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. उलट मास्टर माईंडच्या इराद्याशी ते सुसंगतच नाही का??
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App