Nawab Malik भाजपचा विरोध डावलून नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम; अजितदादांची गोची की त्यांचीच फूस??

Nawab Malik

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Nawab Malik गँगस्टर दाऊद इब्राहिमशी मनी लॉन्ड्रीग करून जमीन हडपल्याबद्दल तुरुंगात जाऊन आलेले आणि सध्या जामीनावर असलेले अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी निवडणूक लढवायला भाजपचा ठाम विरोध आहे, पण भाजपचा विरोध डावलून नवाब मलिक यांनी निवडणूक लढविण्याचा हट्ट चालविला आहे. पण यातून त्यांनी अजित पवारांची गोची केली आहे की अजितदादांची त्यांना फूस आहे??, असा सवाल तयार झाला आहे.

नवाब मलिक जामिनावर सुटून नागपूरच्या अधिवेशनाला उपस्थित राहिल्याबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना जाहीर पत्र लिहून मलिक यांना पुढच्या अधिवेशनाला उपस्थित राहण्यापासून रोखले होते. त्यानंतर आशिष शेलार यांनी भाजप नवाब मलिक यांचे काम बिलकूल करणार नाही, असे स्पष्ट सांगून भाजपची कठोर भूमिका पुन्हा एकदा जाहीर केली. Nawab Malik

दरम्यानच्या काळात नवाब मलिक यांनी अणुशक्तीनगर मधून स्वतःच्या मुलीला सना मलिक यांना अजितदादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट मिळवले. परंतु तेवढ्याने देखील त्यांचे समाधान झाले नाही. ते शिवाजीनगर मानखुर्द मधून एक तर अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या तिकिटावर किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.

अजित पवार, छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल यांनी नवाब मलिक यांची भेट घेतली. त्यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. त्यानंतर देखील आपण निवडणूक लढवणार असल्याचे नवाब मलिक यांनी तीनदा सांगितले. कोणाचा आपल्याला विरोध आहे किंवा नाही त्यांनी फरक पडणार नाही. जनतेचा आग्रहावर निवडणूक लढवणार, असे नवाब मलिक यांनी सांगितले. त्यामुळे अजित पवार नवाब मलिक यांना निवडणूक लढवू नये म्हणून पटवायला गेले होते, की त्यांना फूस लावायला गेले होते??, आणि अजितदादांनी फूस लावली असेल, तर त्यांना भविष्यकालीन राजकारणासाठी ते परवडणार आहे का??, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Nawab Malik Mankhurd Shivaji Nagar Assembly constituency

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात