चॅलेंजचा दिवस; तृणमूळ, भाजप आणि आपसाठी… काँग्रेस कोठेय??


  • सगळ्यात काँग्रेस मात्र दिसत नाही कोलकात्यात, दिल्लीत, लखनौत किंवा डेहराडूनमध्ये!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशाच्या राजकारणात आज चॅलेंजचा दिवस ठरतोय. विशेषतः तृणमूळ काँग्रेस, भाजप आणि आपसाठी… भाजपच्या इनकमिंगने आणि तृणमूळच्या आऊटगोइंगने तृणमूळ काँग्रेसेच्याच नेत्यांच्या रडारवर आलेल्या निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी स्वतःलाच चॅलेंज घेतले. भाजप २०० च काय पण पश्चिम बंगाल विधानसभेत दोन आकडी संख्याही गाठू शकणार नाही, माझे हे ट्विट सेव्ह करून ठेवा. mamata, yogi and kejriwal the day of political challenges

भाजपने दोन आकडी संख्या ओलांडली तर मी निवडणूक रणनीतीचे काम सोडून देईन, असे चॅलेंज स्वीकारणारे ट्विट त्यांनी केले. वास्तविक भाजपने ममतांना ललकारले होते. पण प्रतिललकार प्रशांत किशोर यांनी दिली. mamata yogi and kejriwal the day of political challenges

इकडे प्रशांत किशोर यांचे ट्विट लोक सेव्ह करून ठेवतात ना ठेवताच तो दुसरे चॅलेंज स्वीकारल्याची बातमी आली. विकासाचे मॉडेल योगींचे भारी की केजरीवालांचे की मध्येच उत्तराखंडाचे मुख्यमंत्री देवेद्रसिंग रावत यांचे… दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी विकासाच्या मॉडेलवर चर्चा करण्याचे आव्हान स्वीकारल्याचे वक्तव्य आले. देवेंद्रसिंग रावत हे शून्य कार्यक्षमतेचे मुख्यमंत्री आहेत, अशी टीका करीत मनीष सिसोदिया यांनी उत्तराखंडाचे मंत्री मदन कौशिक यांचे आव्हान स्वीकारल्याचे जाहीर केले.

तसेच उद्याच मी लखनौला येतोय. तेथे योगींचे विकासाचे मॉडेल भारी की केजरीवालांचे हे मी सांगेन, असे चॅलेंजही त्यांनी यूपीच्या मंत्र्यांना देऊन टाकले. याचा अर्थ आता भाजप आणि आपमध्ये विकासाच्या मॉडेलवर पुढचे काही दिवस घमासान रंगणार असे दिसतेय.

आपने दिल्लीत बस्तान बसविल्यानंतर दुसऱ्या राज्यांमध्ये शिरकाव करायचे ठरविलेले दिसतेय. मनीष सिसोदिया त्याच मोहिमेवर ऐन थंडीत बाहेर पडलेले दिसताहेत आणि अचानक त्यांनी विकासाच्या मॉडेलची आव्हानात्मक चर्चा सुरू केलेली दिसतेय. ते आव्हान देताहेत आणि स्वीकारताहेत भाजपचे.

mamata yogi and kejriwal the day of political challenges

या सगळ्यात काँग्रेस मात्र कोठेच दिसत नाही. ना कोलकात्यात, ना दिल्लीत, ना लखनौत, ना डेहराडूनमध्ये. सगळीकडे पक्षात शुकशुकाट दिसतोय… अपवाद फक्त १० जनपथचा… तेथे काल – परवा अलिशान गाड्यांची गर्दी मात्र दिसली.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात