वीज कनेक्शनसाठी विलंब झाल्यास ग्राहकास भरपाई


  • केंद्रीय ऊर्जामंत्री राजकुमार सिंग यांची माहिती

विशेष प्रतिनिधी 

नऊ दिल्ली : वीज कानेक्शचा अर्ज करूनही निर्धारित वेळेत ते दिले नाही तर ग्राहकांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. भरपाईची रक्कम ग्राहकाच्या खात्यात वर्ग केली जाईल, असे केंद्रीय ऊर्जामंत्री राजकुमार सिंग यांनी ट्विट करून स्पष्ट केले. Penalty amount to be credited in consumer account

वीज ग्राहकांच्या हक्कांच्या नियामाबाबत त्यांनी ही महत्वपूर्ण घोषणा केली. प्रथमच ग्राहकांना केंद्रस्थानी ठेऊन हा निर्णय घेतला आहे, असे सांगताना सिंग म्हणाले, ग्राहकांना सेवा देण्यासाठीच विद्युत यंत्रणा अस्तित्त्वात असल्याचे या नियमातून दिसते.

नवीन विज कनेक्शन मिळण्यासाठी अर्ज करण्याच्या तारखेपासून, मेट्रो शहरांमध्ये जास्तीत जास्त 7 दिवस, इतर शहरांमध्ये 15 दिवस आणि ग्रामीण भागात 30 दिवसांची कमाल मुदत देण्यात येत आहे. या मुदतीत कनेक्शन दिले नाही तर ग्राहकाला आता भरपाई मिळणार आहे.

पहिल्यांदाच सरकारने हे म्हटले आहे की, ग्राहकांना हक्क असतात. त्या अधिकारांचा वापर करता येतो आणि त्यांचे उल्लंघन केल्यास ही भरपाई केली जाऊ शकते.

Penalty amount to be credited in consumer account

आम्ही नवीन नियमांद्वारे सर्वसामान्यांना सामर्थ्यवान बनवित आहोत. सेवा पुरवठादारांना दंड केल्याशिवाय ते वठणीवर नाहीत. ग्राहकांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्यांवर हा प्रभावी उपाय असेल.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात