विशेष प्रतिनिधी
चेन्नई – मुंबईतील साकेत नावाचा व्यक्ती हा कमल हसन यांचा जबरदस्त फॅन. अलीकडेच त्यांना मेंदूचा कर्करोग असल्याचे निदान झाले. दीर्घकाळापासून साकेत हे कमल हसन यांच्याशी बोलू इच्छित होते. साकेतची तब्येत आणि त्यांची बोलण्याची इच्छा पाहून कमल हसन यांनी थेट त्यांच्याशी संवाद साधला. Kamal Hasan talks with his fan on VC
दक्षिणेतील सुपरस्टार अभिनेते कमल हसन यांचे जगभरात चाहते आहेत. अलीकडेच त्यांनी मुंबईतील एका चाहत्याशी व्हिडिओ कॉलवरुन संवाद साधला. या संवादाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या चाहत्याला मेंदूचा कर्करोग असून त्याने कमल हसन यांच्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली होती. कमल हसन यांच्या संवादाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
साकेत आणि त्यांच्या कुटुंबाने कमल हसन यांच्याशी व्हिडिओ कॉलवरुन संवाद साधला. कमल हसन यांना पाहण्याची साकेत यांची इच्छा होती आणि ती पूर्ण झाली.
Kamal Hasan talks with his fan on VC
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App