चीनचा पंतप्रधान मोदींवर राग आहे.अशिया खंडात केवळ भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच चीनच्या आव्हानाचा सामना करू शकतात. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटविण्यासाठी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये चीन हस्तक्षेप करून गडबड करू शकतो, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते कैलास विजयवर्गिय यांनी दिला आहे. Kailash Vijayvargiya warns that China may manipulate the 2024 elections to remove Prime Minister Narendra Modi
विशेष प्रतिनिधी
इंदूर :चीनचा पंतप्रधान मोदींवर राग आहे.अशिया खंडात केवळ भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच चीनच्या आव्हानाचा सामना करू शकतात. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटविण्यासाठी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये चीन हस्तक्षेप करून गडबड करू शकतो, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते कैलास विजयवर्गिय यांनी दिला आहे.
केंद्रातील पंतप्रधान मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमिततने इंदूर येथे पत्रकारांशी बोलताना भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय म्हणाले, अमेरिकेत डोनाल्ड ट्रंप यांना हटविण्यासाठी चीनने मदत केली होती. त्याच पध्दतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटवण्यासाठी २०२४ मध्य लोकसभा निवडणुकांमध्ये चीन हस्तक्षेप करून गडबड करू शकतो. याचे कारण म्हणजे आशिया खंडात केवळ भारतच असा देश आहे, जो या प्रकारच्या आव्हानाचा सामना करत आहे.
चीन अन्य कोणत्याही देशाला पुढे जाऊ देत नाही आणि पुढे जाण्याचा प्रयत्न कोणता देश करत असेल, तर त्याला मागे ओढण्यासाठी चीन वाट्टेल ते करतो. हेच चीनचे धोरण आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा केवळ भारतालाच सर्वाधिक फटका बसला आहे. आशिया खंडातील दुसऱ्या देशांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी झळ इतक्या मोठ्या प्रमाणात बसली नाही. म्हणूनच भारतात त्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर होईल, याचा अंदाज कुणीच बांधला नव्हता. भारत आणि अमेरिका या देशांवर चीन नाराज असल्यासंबंधी जागतिक स्तरावरील मीडियामध्येही चर्चा सुरू आहे. कोरोना हा चीनचा मानवनिर्मित विषाणू असल्याची शक्यता आता अमेरिकन शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत, असेही विजयवर्गीय यांनी म्हटले आहे.
कोरोना संकटाच्या काळात विरोधकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वागायला हवे. जनतेच्या समस्या, अडचणी सोडवण्यासाठी सरकारला सहकार्य करायला हवे, असे आवाहन विजयवर्गीय यांनी केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App