जॉन्सन अँड जॉन्सन 2023 पर्यंत जगभरात टॅल्कम बेबी पावडरची विक्री थांबवणार आहे. कायदेशीर लढाईमुळे अडचणीत आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. जॉन्सनची पावडर वर्षभरापूर्वीच अमेरिका आणि कॅनडामध्ये बंद करण्यात आलेली आहे.Johnson’s talcum baby powder to close No more sales from next year, company says – tired of legal battle
खरं तर या बेबी पावडरमुळे कर्करोग होतो, असा आरोप करण्यात आला. त्यानंतर जगभरात कंपनीवर हजारो खटले दाखल झाले. इतकेच नाही तर कॅन्सरच्या आशंकाचा अहवाल समोर आल्यानंतर उत्पादनाच्या विक्रीत मोठी घट झाली होती. आता कंपनी टॅल्क बेस्ड पावडरच्या जागी कॉर्न स्टार्च बेस्ड पावडर विक्रीचा व्यावसायिक निर्णय घेण्यात आला आहे.
टॅल्क म्हणजे काय ?
टॅल्क हे नैसर्गिकरित्या आढळणारे खनिज आहे. जे पृथ्वीवरून काढले जाते. त्यात मॅग्नेशियम, सिलिकॉन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन असते. रासायनिकदृष्ट्या, टॅल्क हे Mg3Si4O10(OH)2 या रासायनिक सूत्रासह एक हायड्रोस मॅग्नेशियम सिलिकेट आहे. सौंदर्य प्रसाधने आणि इतर वैयक्तिक काळजी उत्पादनांमध्ये टॅल्कचा वापर केला जातो. हे ओलावा शोषण्यासाठी वापरले जाते.
टॅल्कपासून कर्करोगाचा धोका असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कारण जिथून टॅल्क उत्खनन केले जाते. तिथून अॅस्बेटोस देखील सोडला जातो. एस्बेस्टॉस अभ्रक हे देखील नैसर्गिकरित्या उद्भवणारे सिलिकेट खनिज आहे. परंतू त्याची क्रिस्टल रचना वेगळी आहे. त्यामुळे शरीराची हानी होते. जेव्हा टॅल्क उत्खनन केले जाते. तेव्हा त्यात एस्बेस्टोस मिळण्याचा धोका असतो.
कॉर्न बेस्ड पावडर म्हणजे काय?
कॉर्नस्टार्च कॉर्नपासून बनवले जाते. ज्याचा उपयोग त्वचेच्या निगा राखण्यात होतो. यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि दाहक-विरोधी गुणधर्मांचा समावेश आहे. त्यात जीवनसत्त्वे A, B1, B2, C आणि झिंक, कॅल्शियम आणि लोहासारखी खनिजे असतात. ज्यामुळे त्वचा मुलायम आणि आर्द्र होण्यास मदत होते.
पावडर सुरक्षित असल्याचे कंपनीचे म्हणणे कंपनीने स्वतः त्याच्या पावडरवर संशोधन करून दावा केला. की, त्यांची टॅल्कम बेबी पावडर सुरक्षित आहे. या पासून कर्करोग होत नाही. J & J ने गुरुवारी सांगीतले की, त्यांनी मुल्यांकन केल्यानंतर सर्व बेबी पावडर उत्पादनांसाठी टॅल्कम पावडरऐवजी कॉर्नस्टार्च वापरण्याचा व्यावसायिक निर्णय घेतला आहे.
कंपनीला पैसे देण्याची सक्ती
न्यायालयात दाखल करताना, J&J च्या वकिलाने म्हटले आहे की, कंपनीने खटल्यासाठी गेल्या पाच वर्षांत 1 अब्ज डॉलर (सुमारे 7,968 कोटी रुपये) पेक्षा जास्त पैसे दिले आहेत. कंपनीच्या दिवाळखोरी अहवालानुसार, J&J ला आतापर्यंत सुमारे 3.5 बिलियन डॉलर (रु. 28 हजार कोटी) ची सेटलमेंट प्रकरणे निकाली काढण्यासाठी देणे भाग पडले आहे.
2018 च्या ज्युरीने सेंट लुईसमधील राज्य न्यायालयाच्या निकालाने शेवटी J & J ला 20 महिलांना 2.5 अब्ज डॉलर (20 हजार कोटी रूपये) देण्यास भाग पाडले. ज्यांनी त्यांच्या गर्भाशयाच्या कर्करोगासाठी बेबी पावडरला लक्ष्य केले. मिसुरी सुप्रीम कोर्ट आणि यूएस सुप्रीम कोर्ट या दोघांनीही निर्णय रद्द करण्यास नकार दिला.
पावडर 1894 पासून विकली जात आहे
जॉन्सन बेबी पावडर, 1894 पासून विकली जाते. कुटुंबासाठी अनुकूल असल्यामुळे कंपनीचे प्रतीक उत्पादन बनले. 1999 पासून, कंपनीचा अंतर्गत बेबी प्रोडक्ट विभाग त्यांचे वितरण कंपनीचे प्रतिनिधी करित होते. J & J च्या “#1 मालमत्ता” प्रमाणे यात प्रामुख्याने बेबी पावडर असते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App