प्रतिनिधी
मुंबई : विनायक मेटे यांच्या निधनानंतर मराठा संघटनांच्या अनेक नेत्यांनी याविषयी संशय व्यक्त केला आहे. कारण त्यांच्या बरोबर असलेल्या एकनाथ कदम यांनी मुंबई – पुणे एक्सप्रेस वे वर अनेकांना मदतीचा हात मागितला परंतु तो तासभर कुणीही मदतीसाठी थांबले नाही, असा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर मेटेंचा अपघात की घातपात??, असा संशय तयार झाला आहे. या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशी आणि तपासाचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर अपघाताच्या तपासासाठी पोलिसांनी आठ टीम नियुक्त केल्या आहेत. पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेज पासून अगदी बारकाईतले तपशील तपासायला सुरुवात केली आहे. ज्या ट्रकने मी त्यांच्या गाडीला धडक दिली तो निघून गेला आहे तो ट्रक कोणता?( त्यात नेमके कोण होते??, याचा तपास पोलीस करत आहेत. या तपासात नेत्यांच्या अपघाती निधनाचे सत्य बाहेर येणे अपेक्षित आहे.Vinayak Mete’s accident or mishap??; Colleagues allege that no one stopped for 1 hour to help; Chief Minister’s order for inquiry
पहाटेच्या अपघातात मदत नाही
मराठा आरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा नेता, जगाला हेवा वाटावा असे शिवस्मारक व्हावे यासाठी आटोकाट प्रयत्न करणारा आवाज माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले आहे. आज मराठा क्रांती मोर्चाची बैठक मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती, त्याच बैठकीला हजेरी लावण्याकरिता मेटे बीडहून मुंबईकडे येत होते.
बीडमध्ये आज मोठा कार्यक्रम असतानाही समाजाच्या प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी आपली उपस्थिती महत्त्वाची आहे, हे प्रमाण मानून त्यांनी बीडमधला कार्यक्रम सोडला आणि मुंबईच्या दिशेने रवाना झाले. पण वाटेत त्यांना काळाने गाठले. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर रायगडच्या हद्दीत त्यांचा अपघात झाला. अपघातानंतर सुमारे तासभर त्यांना मदतच मिळाली नाही, असा गंभीर आरोप त्यांच्या सहकाऱ्याने केला आहे.
अपघातानंतर एक तासभर कुणाचीही मदत नाही
मेटे यांचे सहकारी एकनाथ कदम हे देखील यावेळी त्यांच्यासोबत होते. त्यांनी माध्यमांनी सांगितले की, बीडकडून आम्ही मुंबईकडे येत असताना हा अपघात झाला. आम्हाला एका ट्रकने कट मारला. आम्हाला अपघातानंतर एक तास मदत मिळाली नाही. 100 नंबरला आम्ही फोन केला मात्र त्यांनी फोन उचलला नाही. मदतीसाठी मी प्रत्येकाला विनवणी करत होतो मात्र कुणीही गाडी थांबवली नाही. मी रोडवर झोपलो होतो, आम्ही गाड्यांना हात करत होतो, मग एका गाडीवाल्याने गाडी थांबवली आणि आम्हाला मदत केली. एका तासानंतर तिथे रुग्णवाहिका आली. अपघातानंतर मी मेटे यांच्याशी बोललो तर तेव्हा ते माझ्याशी संवाद करत होते. एकनाथ कदम हे अपघातावेळी मेटे यांच्या सोबत होते. कदम यांना या अपघातात किरकोळ मार लागला आहे. मदतीसाठी एक तास कुणीही आले नसल्याचे कदम यांनी सांगितले. यंत्रणांनी देखील मदत केली नाही, असे कदम म्हणाले.
मेटेंच्या डोक्याला गंभीर दुखापत
मेटे यांच्या गाडीची स्थिती पाहून अपघात किती गंभीर आहे याची प्रचिती येत होती. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर मुंबईच्या दिशेने मेटे येत होते. हायवेवरील पनवेल ते खालपूर दरम्यानच्या माडप बोगद्याजवळ हा अपघात घडला. पुढे जाणाऱ्या गाडीला मेटे यांच्या गाडीने जोरात धडक दिली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गाडीच्या डाव्या बाजूचा चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर मेटे यांना एक तासभर कुणाचीही मदत झाली नाही. त्यानंतर त्यानंतर एमजीएम रुग्णालयात दाखल केले होते. मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते.
अपघात की घातपात??
मुख्यमंत्र्यांसोबत मराठा आरक्षणासाठी महत्त्वपूर्ण बैठकीसाठी राज्यभरातून कार्यकर्ते आले होते. मात्र, या दरम्यान मेटे यांच्या गाडीला अपघात झाला या अपघातानंतर दोन तास कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. त्या ठिकाणी कोणतीही सुविधा मिळाली नाही. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. हा अपघात झालाय की घातपात झाला हे सरकारने तात्काळ जाहीर करावे. अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App